Mumbai Local Train Video: मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे रेल्वे प्रशासनावर अनेकांनी टीकांचे ताशेरे ओढले आहेत. आणि साहजिकच प्रवाशांच्या वेळेला व सोयीला या काही दिवसांमध्ये महत्त्व देण्यात आलेले नाहीच. पण म्हणतात ना टाळी एका हाताने वाजत नाही, तसंच सगळ्याच आरोपांचं ओझं रेल्वेवर टाकून मोकळं होता येणार नाही. आजवर अनेकदा आपणही बेजबाबदार प्रवासी पाहिले असतील. फक्त विनातिकीट ट्रेन पकडणे किंवा ट्रेनमध्ये कचरा करणे एवढेच नाही तर कित्येकदा प्रवासी स्वतः स्वतःच्या जीवाची जबाबदारी सुद्धा नीट घेत नाहीत. आणि विशेष म्हणजे असं वागताना त्यांना कोणत्याच प्रकारे आपण चुकतोय याची जाणीवच नसते, उदाहरणार्थ हा सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही बघू शकता की दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोर थांबलेल्या आहेत. आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लोक चक्क एका ट्रेनमधून दुसर्या ट्रेनमध्ये उडी मारत आहेत. यात एक महिला तर चक्क साडी नेसून हा स्टंट करतेय तर एक महाशय छान बागेत फिरायला आल्याप्रमाणे हातात मोबाईल व कानाला इयरफोन लावून ट्रेन बदलतायत. साहजिकच यावरून प्रवाशांना सुद्धा असे प्रकार करण्याची सवय झाली आहे असे दिसतेय. पण मुळात ही वागणूक किती चुकीची आहे आणि अशा घाईत एखाद्याला काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोणाची याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

मुंबई लोकलमधील संतापजनक Video

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘आई’ने बाळासाठी लावली डोक्याची बाजी; Video पाहून लोकं म्हणाली, “मराठी बाई म्हणजे…”

हा वर पाहिलेला व्हिडीओ एक प्रातिनिधिक असला तरी सुद्धा असे प्रकार आपण रोज पाहत असतो. ट्रेनला प्लॅटफॉर्मवर गर्दी होते म्हणून उलट दिशेला जाऊन उभं राहायचं व तशी ट्रेन पकडायची, प्लॅटफॉर्म बदलायला वेळ नाही म्हणून चक्क रूळावरून चालत जायचं, अनेकदा हे प्रकार करताना प्रवासी हातात लहान बाळ आहे की नाही याचीही काळजी करत नाहीत. तूर्तास आपण पाहिलेला व्हिडीओ हा नवीन आहे का किंवा कोणत्या स्थानकावरील आहे याचा तपास समोर आलेला नाही पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढंच सुचवू इच्छितो की अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रवाशांनी जबाबदार होणं आणि रेल्वेने पाऊल उचलणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local people jump from one train to other angry netizens slams calling it risky causes train accidents punishments svs
Show comments