Mumbai local video: मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इथे रिल्स बनवतात, फॅशन करतात. कधी कधी विचार येतो मुंबईची लोकल नसती तर मुंबईचं काय झालं असतं? इतक्या मोठ्या शहराला लोकलनेच सांभाळून घेतलंय. बाहेरून येणारे लोक सुद्धा या लोकलला बघण्यासाठी येतात. मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबईतील लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मध्य रेल्वेच्या एसी ट्रेनमध्ये चक्क एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढल्याने महिलांचा गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एसी लोकलमध्ये एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढला आहे. यावेळी या व्यक्तीला पाहून सगळ्या महिला घाबरल्या असून त्या आरडा ओरडा करु लागल्या आहेत. तसेच दरवाजे बंद झाल्यानं त्या अधिकच घाबरल्या असून मदतीसाठी बाहेरच्या प्रवाशांना हात दाखवत आहेत. यावेळी महिलांचा आरडा-ओरडा आणि किंकाळ्या ऐकू येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ घाटकोपर रेल्वे स्थानकावरचा आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एसी लोकल थांबलेली तेव्हा हा मनोरुग्ण नग्न अवस्थेत चढला.सोमवारी दुपारी १६ डिसेंबर २०२४ ही घटना घडली. चार वाजून अकरा मिनिटांनी कल्याण एसी लोक घाटकोपर स्थानकावर थांबली. ट्रेन स्टेशनवर आल्यावर लगेचच हा मनोरुग्ण या डब्यात चढला. हा व्यक्ती लोकलमध्ये चढताच खूप आरडाओरडा झाला. एसी लोकलमध्ये अनेक महिलांनी गोंधळ घालण्यात सुरुवात केली. महिलांच्या या गोंधळामुळे एसी लोकलमधील तिकीट निरीक्षक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या नग्न अवस्थेतमध्ये असलेल्या व्यक्तीला ट्रेनच्या बाहेर काढले. यानंतर तिथे उपस्थितीत असलेल्या महिलांसह प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अरे देवा! लग्नात मित्रांनी आणलं असं गिफ्ट की पाहून नवरदेवही नको नको करायला लागला; VIDEO पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असून अचानक महिलांच्या डब्यात हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.