Mumbai Local Train : महाराष्ट्राची राजधानी मुंबई सर्वांना हवीहवीशी वाटते. दर दिवशी हजारो लोकं आपल्या स्वप्नांच्या मागे धावत मुंबई शहर गाठतात. मुंबईकरांना आणि गावा-शहरातून मुंबईत स्थायिक होणाऱ्या प्रत्येकाला मुंबई ही आपली वाटते. कोणी नोकरीसाठी तर कोणी शिक्षणासाठी, कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर कुणी व्यवसाय करण्यासाठी मुंबईत येतात आणि कधी ही मुंबई त्यांना स्वत:मध्ये सामावून घेते, हे त्यांना सुद्धा कळत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर मुंबईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंबईचा समुद्र असो की येथील वडापाव, येथे सिनेसृष्टीतील मंडळी असो की सर्वसामान्यांची लोकल असो. प्रत्येक गोष्ट या शहराची लोकप्रिय आहे. मुंबईची लोकल तर हा मुंबईकरांचा जीव की प्राण आहे. दर दिवशी हजारोंच्या संख्येने येथील लोकं लोकलनी प्रवास करतात. एक दिवस जरी लोकल बंद असली तर अनेकांचे वेळापत्रक चुकतात.अशात मुंबई लोकल आणि मरणाची गर्दी हे समीकरण वर्षानुवर्षे आपण बघत आहोत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल मध्ये चढताना मरणाची गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा असा आनंद घ्यावा! ७० वर्षाच्या आजीचा जबरदस्त कॅटवॉक, व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लोकल स्टेशनवर येत असते. लोकल ट्रेनचा वेग हळू हळू कमी होताना दिसतो अशातच या धावत्या लोकलमध्येच लोक चढायला सुरुवात करतात. त्यानंतर लोकल थांबते आणि लोकल ट्रेनमध्ये चढण्याची एकच गर्दी पाहायला मिळते. धक्काबुक्की करत आणि एकमेकांना मागे पुढे करत लोकं चढताना दिसतात. मुंबईकर हे आयुष्य दररोज जगतात.लोकलमध्ये बसायला दूर तर उभं राहायला तरी जागा मिळावी,एवढीच या लोकांनी किमान अपेक्षा असते.

mumbai.sheher या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?” काही युजर्सनी उत्तर दिलेय, “दादर” तर काही युजर्सनी उत्तर दिलेय, “कुर्ला” एका युजरने लिहिलेय, “लोकल हा मुंबईचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे लोकं खूप साधी आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train and its a huge crowd why mumbaikar love local train watch viral video of mumbai city ndj
Show comments