Mumbai local video goes viral: मुंबई लोकलच्या दोन डब्यांमधील जागेत उभं राहून एक तरुण जीवघेणा प्रवास करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहू तुमच्याही अंगावर काटा येईल. काळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकलमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. पण, खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का? तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.

तरुणाचा जीवघेणा प्रवास

Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. वेळेत ऑफिसला जाणाच्या गडबडीत प्रत्येक जण ठरलेली लोकल पकडण्याचा घाईत असतो. मुंबईच्या लोकलमधील दोन डबे डोडलेले असतात. यामध्ये थोडीशी जागा असते, व्यवस्थित उभे राहता येईल अशी ती जागा नसते मात्र हा तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याठिकाणी ऊभा आहे. यावेळी तरुणानं थोडीशी जरी हालचाल केली तरी तो लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. एवढी रिस्क घेऊन हा तरुण प्रवास करत आहेत. मुंबईकर ही कसरत दररोज करतात अन् त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लाईफलाईन की मृत्यूचा सापळा?

मुंबईची जान म्हणजे लोकल ट्रेन…सोमवार असो की रविवार मुंबईकरत कधी थांबत नाही. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबईकर असाल तर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपल्या जीवापेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही किंवा काम नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘आमच्या ट्रेनमध्ये चढू नका’ बदलापुरात लोकल ट्रेनचे दरवाजे आतून केले बंद; संतप्त प्रवाशांचा गोंधळ

हा व्हिडीओ @aamchi_mumbai या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मुंबईकरांनी यावर संतापजनक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.