Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. यामध्ये अशा काही घटना बघायला मिळतात जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. नुकताच मुंबईच्या लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण ट्रेनमध्ये गाताना दिसत आहेत. या तरुणांनी आपल्या गाण्याने असे काही वातावरण निर्माण केले की, बाकीचे प्रवासी देखील त्याच्यासोबत गाऊ लागले.

कृपया कळवा की हा व्हिडिओ aamchi_mumbai नावाच्या अकाउंटने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन मुलं गिटार घेऊन प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रवासादरम्यान, एक मुलगा गिटार वाजवू लागतो आणि दुसरा मुलगा गाणे गाऊ लागतो. त्यानंतर दोन्ही तरुण ‘क्या हुआ तेरा वादा’ गाणे म्हणू लागतात. दोन्ही तरुणांनी आपल्या गाण्याने अशी छाप पाडली की बाकीचे प्रवासीही स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांच्यासोबत गाऊ लागले.

Video of little girl singing Yeh Raaten Yeh Mausam
“हा गोंडस आवाज तिचा नाही”? ‘ये रातें, ये मोसम’ गाणे गाणाऱ्या चिमुकलीचा Viral Video पाहून नेटकऱ्यांचा दावा, काय आहे सत्य?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
kaanchi re kaanchi re
कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video
indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद

मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ एकदा पाहाचं..

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ नदीला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात; यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क)

या व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन तरुणांसोबत इतर प्रवासीही त्यांच्यासोबत जोरजोरात गाणे गाताना दिसत आहेत. जेव्हा या तरुणांनी गायला सुरुवात केली तेव्हा बाकीचे प्रवासी त्यांना फक्त पाहत होते, परंतु त्याचा आवाज ऐकून ते स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्याच्यासोबत गाणे गाऊ लागले. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हायरल व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. तुम्हीही एकदा हा व्हिडीओ नक्की पाहा..