Mumbai Local Video: मागील काही दिवसात पावसाने मुंबई, ठाणे, पुण्याच्या नागरिकांना थोडा ब्रेक दिला आहे. पण तरीही ‘या’ ना ‘त्या’ कारणाने रोज मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये विलंब कायम होत आहे. ट्रेनला उशीर झाला की साहजिकच स्टेशनवर तुफान गर्दी होते. अशावेळी जेव्हा ट्रेन खूप वाट पाहायला लावून स्टेशनवर येते तेव्हा मग रोजची सवय असलेले मास्टर पहिल्या रांगेतून, थोडीफार हिंमत असणारे दुसऱ्या रांगेतून ट्रेन पकडतात आणि उरलेले सुरलेले ट्रेन बघत बसतात. मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर, डोंबिवली स्थानकात तर हे दृश्य नेहमीचं असतं. कधी कधी तर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करत प्रवास करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@aamchi_Mumbai या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मोटरमनच्या केबिनमध्ये खूप गर्दी झाल्याचे दिसत आहे/ या व्हिडिओवर लिहिलेल्या कॅप्शननुसार हे प्रवासी डोंबिवलीचे असल्याचे समजतेय. डोंबिवली ट्रेनमध्ये लोकोपायलटच्या केबिनमध्ये अनेकजण दाटीवाटीने उभे असल्याचे दिसत आहे, प्राप्त माहितीनुसार या केबिनमध्ये उभे असलेले सर्वजण हे मोटरमन आहेत.

Video: लोकलची गर्दी वाढली, रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक

हे ही वाचा<< “डब्याचे पैसे काय मागता” झोमॅटोच्या बिलाचा फोटो दाखवत तरुणीचा संताप; ‘हे’ छुपे दर तुम्ही तपासता का?

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट करून मुंबईकरांचा जुगाड जबरदस्त असतोच. तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना सुद्धा बसायला हक्काची जागा मिळू नये हे खूपच चुकीचं आहे असं म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर तक्रारीचा सूर लावला आहे. तुमचं याविषयी काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा!