Viral video: मुंबईची लोकल ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी मुंबई लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क दोन पुरुष एकमेकांशीजोरदार भांडताना दिसत आहेत.
प्लॅटफॉर्म बनला कुस्तीचा आखाडा
लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये वारंवार हाणामारी झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. अनेकवेळा या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होऊन हाणामारीही होते. मुंबईतील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकल ट्रेनमधील दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण होत आहे. यावेळी हे एकमेकांना शिवीगाळही करताना दिसत आहेत.
लोकलच्या दरवाजातच तुफान हाणामारी
हा व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा असल्याचं म्हटलं जात आहे, जिथे ट्रेनमधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. त्यातील एक व्यक्ती उंच दिसतेय तर एक कमी उंचीची आहे. यावेळी कमी उंचीचा व्यक्ती संयमाने बोलत होता पण इतक्यात खाली उभ्या असलेल्या प्रवाशाने शिवीगाळ सुरू केली, तेव्हा मात्र त्याचा पारा चढला आणि प्रवाशाला पकडून मारायला सुरुवात केली. यावेळी उंची लहान, किर्ती महान याचा प्रत्यय सगळ्यांनाच आला. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेनखाली उभं राहून शिवीगाळ करणार्या व्यक्तीला स्वतःचा बचावही करता आला नाही. मारामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर कमेंट करून मजा घेत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चोर नग्न अवस्थेत करतोय चोऱ्या; उत्तरप्रदेशातील चोरीच्या धक्कादायक प्रकाराचा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकाने युजरने कमेंट करत लिहिले, ‘लोकांनी भांडणं थांबवायला हवी तर सगळे उभे राहून पाहत आहेत.’