Mumbai local Fight viral video: मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास हा अनेकांच्या रोजच्या जीवनातील भाग आहे. अनेक जण नोकरी-धंद्यानिमित्त, तर काही जण शिक्षणानिमित्त रोज मुंबई लोकलने प्रवास करतात. काही जण पर्यटनासाठी मुंबईत येतात आणि तेव्हा लोकलने प्रवास करीत मुंबईतील अनेक सुंदर ठिकाणं फिरतात. या मुंबई लोकलने प्रवास करताना अनेक चांगले-वाईट प्रसंग घडत असतात. पण, अनेकदा मुंबई लोकलमधील भांडणं, मारामारीचेच विषय चर्चेत असतात. सध्या मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात काही महिलांमध्ये सीटसाठी तुफान राडा झाल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Local Train Video)
मुंबई लोकलमधील या व्हिडीओमध्ये काही महिला एकमेकींना शिवीगाळ करीत धमकावताना दिसत आहेत. या महिलांमध्ये सीटवर बसण्यावरून भांडण झाल्याचे सांगण्याच येत आहे. या भांडणात काही जणी ट्रेनमध्ये पोलिसांना बोलवा, असे म्हणताना ऐकू येत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला सीटवर बसून कोणाला तरी फोन लावत आहे आणि दुसरी महिला तिच्यासमोर उभी राहून तिच्या तोंडावर छत्री भिरकावत, ‘जा, जा, तुझ्या बापाला फोन लाव, तुझ्या बापाला बोलव’, असे म्हणत आहे. त्यानंतर दुसरी महिला गेटच्या दिशेने पाहते आणि कोणाला तरी म्हणते की, पोलिसांना बोलवा, ही महिला सर्वांवर ओरडत आहे. यावेळी आणखी दोन महिला त्या दुसऱ्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हिडीओच्या शेवटी असे दिसते की, सीटवर बसलेली महिला उठते आणि गेटच्या दिशेने जाते आणि पोलिसांना फोन करू लागते. व्हायरल व्हिडीओमध्ये असं बरंच काही दिसत होतं.
हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस
सीटवरुन महिलांमध्ये तुफान राडा अन् शिवीगाळ
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तो आतापर्यंत हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ट्रेनमध्ये पुन्हा एकदा राडा, हे काही कधीही थांबणार नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, या गोंधळात काही जण दोन स्टेशन पुढे गेले असतील. तिसऱ्या युजरने लिहिले की, भावा, सगळीकडेच जागेसाठी भांडण आहे. आणखी एका युजरने लिहिले की, भारतात आजच्या घडीला ट्रेनमध्ये भांडणे सामान्य आहेत.