Mumbai local Train: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.
मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनने अनेक प्रवासी प्रवास करतात. पण जर सकाळ आणि सायंकाळची वेळ असेल तर चाकारमाण्यांची तोबा गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून येते. अशात जर सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती अक्षरश: पायाच्या दोन अंगठ्यांवर उभा राहून लोकलच्या दरवाजावर लटकत जीवघेणा प्रवास करत आहे. पण, खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का? तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. यातील एखाद्यानं थोडी जरी हालचाल केली तरी तो व्यक्ती लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. किंवा जर या प्रवाशाचा तोल गेला तर जीवावर बेतू शकतं. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबईकर असाल तर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपल्या जीवापेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही किंवा काम नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ऐन गर्दीच्या वेळी ‘उज्जैन’ रेल्वे स्टेशनवर नक्की काय झालं? VIDEO होतोय तुफान व्हायरल
हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ करण्यात आला असून २ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “असा प्रवास करण्याची काहीही गरज नाही” तर एका युजरने लिहिले, “काका तुमचं कुटुंब तुमची घरी वाट बघतंय” आणखी एका युजरने लिहिले, “काम दुसरं मिळेल पण जीव नाही”