31 डिसेंबर आणि १ जानेवारीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. सर्व जण २०२३ या वर्षाला निरोप द्यायला सज्ज आहेत आणि नवीन वर्षाचे स्वागत करायला उत्सूक आहेत. ३० आणि ३१ डिसेंबरला शनिवार-रविवार असल्यामुळे आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला बहूतांश लोक घराबाहेर पडणार. अशात सगळीकडे भयानक गर्दी दिसून येईल. या गर्दीत लोकलनी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीच्या मध्यरात्री आठ अतिरिक्त लोकल चालवणार आहे. या आठ लोकल चर्चगेट ते विरार या मार्गावरुन जातील. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे लोकलनी प्रवास करणारे प्रवासी खूश आहेत.
पश्चिम रेल्वेने या संदर्भात एक्सवर(X) पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आठ लोकल ट्रेनचा टाइमटेबल शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवीन वर्षानिमित्त प्रवासांची गर्दी होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष आठ लोकल ट्रेन चालवणार आहे. यामध्ये चार ट्रेन चर्चगेटवरुन विरारला जातील तर चार ट्रेन विरारवरुन चर्चगेटला जातील.” पश्चिम रेल्वेच्या या ट्विटवर एका युजरने मनापासून त्यांचे आभार मानले आहे.
पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे अनेकांची चिंता मिटली आहे. ३१ डिसेंबरला जे घराबाहेर पडण्याचा विचार करताहेत त्यांना आता घरी परत येण्यास प्रवासाचे साधन उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : Video : मित्रांनो, लग्न करण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा, तरुणाने सांगितलं कटू सत्य
लोकल हा मुंबईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दरदिवशी हजारो लोकं लोकलनी प्रवास करतात. मुंबईकरांची जीव की प्राण असणारी लोकल एक दिवस जरी बंद असली तरी अनेकांचे वेळापत्रक चुकते. नियमित प्रवास करणाऱ्यांना माहिती असेल की लोकलमध्ये किती गर्दी असते. सणावाराला तर उभे राहायला सुद्धा जागा नसते अशात ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला अनेक जण नवीन वर्षाचे स्वागत करायला घराबाहेर पडतात. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईकर शहरातील लोकप्रिय ठिकाणी गोळा होतात.अशा वेळी मुंबईकरांची रात्री घरी परतण्याची सोय व्हावी, याच उद्देशाने पश्चिम रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.