Viral video: सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी पूर्ण वेळ गजबजलेलं शहर म्हणजे मुंबई. मायानगरी म्हणून कायम मुंबईकडे पाहिलं जातं. मुंबई कधीच थांबत नाही किंवा शांतही होत नाही. त्यामुळे या धावत्या शहराचं साऱ्यांनाच आकर्षण आहे. त्यातीलच सीएसटी, सीएसएमटी, दादर यांसारख्या स्टेशनवर तर नेहमी प्रवाशांची मुग्यांसारखी गर्दी असते. याच सीएसएमटी स्टेशनचरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेशनवर प्रवाशांची नेहमीसारखी वरदळ सुरु असताना अचानक सर्व प्रवासी एकाच तालात नाचायला लागले आहेत. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, हल्ली लोक काहीही घडलं की त्याचे फोटो, व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर अपलोड करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकावर सर्व प्रवाशी आनंद व्यक्त करत नाचत आहेत. नाचणाऱ्यांचा हा जल्लोष एका मोटारमनच्या सेवानिवृत्तीसाठीचा आहे. गेल्या आठवड्यात एका मोटरमनने त्याच्या निवृत्तीच्या दिवशी शेवटची लोकल ट्रेन चालवली होती. तेव्हा प्रवाशांनी अशा पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला. @mumbairailusers या इंस्टाअकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्यात. मुंबई लोकल ट्रेन नेहमीच चर्चेचा विषय असतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> हृदयद्रावक! उत्तर प्रदेशात विजेचा शॉक लागून कामगाराचा भयंकर शेवट, क्षणात शीर धडापासून झाले वेगळे
अनेकदा मुंबई लोकल हे कुस्तीचे आखाडे आहेत की काय असे वाटते कारण प्रवासात एकदा तरी कुणाची ना कुणाची भांडणं होतातच, अनेकदा व्यक्ती एकमेकांशी शुल्लक कारणावरून वाद करतात. वाद वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर होतं. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीचा जल्लोष पाहून नेटकऱ्यांनीही यावर सकारात्मक कमेंट केल्यात.