Mumbai Local Shocking Video : सोशल मीडियावर हल्ली असे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, जे पाहताना आपल्यालाही लाज वाटते. या व्हिडीओंमध्ये लोक काळ, वेळ, ठिकाण काही न पाहता असे काही कृत्य करताना दिसतात, जे पाहून तळ पायाची आग मस्तकात जाते. यात प्रसिद्धीसाठी हल्ली लोक मुंबई लोकल ट्रेनमध्ये अश्लील व्हिडीओ बनवताना दिसतात. त्यामुळे कायम गर्दीमुळे चर्चेत असणारी मुंबई लोकल हल्ली अशा अश्लील व्हिडीओंमुळे चर्चेत आली आहे. अशा घटनांमुळे ट्रेनमधील प्रवाशांना नाहक त्रास होतो. सध्या मुंबई लोकलमधील एका तरुणीचा असाच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक तरुणी भरट्रेनमध्ये असे काही अश्लील कृत्य करतेय की पाहून आजूबाजू्च्या लोकांनाही लाजेने मान फिरवून बसण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहून लोक आता तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या व्हिडीओतील तरुणी ट्रेनमध्ये असे काही कृत्य करू लागली की पाहून लोकांनाही धक्का बसला. अनेकांनी ट्रेनमध्ये अशाप्रकारे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई केली पाहिजे आणि अशा घटनांना आळा घातला पाहिजे अशी मागणी केली आहे. पण हा व्हिडीओ नेमका कोणत्या रेल्वे स्थानकादरम्यानचा आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.
लोकल ट्रेनमध्ये तरुणीचे अश्लील कृत्य (Mumbai Local Shocking Video)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई लोकलमध्ये एक तरुणी मिनी स्कर्ट आणि त्यावर व्हाइट शर्ट घालून अतिशय अश्लील अवस्थेत बसली आहे. यावेळी ती खूप विचित्र अशा पोज देत फोटो काढतेय, रील व्हिडीओ शूट करतेय. व्हिडीओत तुम्ही नीट पाहिलं तर एक आजोबा तरुणीचे सुरू असलेले अश्लील हावभाव पाहून दुसऱ्या ठिकाणच्या सीटवर जाऊन बसणे पसंत करतात. इतकेच काय तर तरुणीचा सुरू असलेला अश्लीलपणा पाहून अनेक प्रवासी मान दुसरीकडे फिरवून बसतात. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी ट्रेनमधून उतरल्यानंतरही अशाप्रकारे रील्स बनवतेय. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांनी तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई लोकलमधील (Mumbai Local Video) हा व्हिडीओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये पोल डान्स केल्याबद्दल भारतीय रेल्वेचे आभार, अमेरिकन लोकांनाही ही सुविधा परवडत नाही. कॅप्शन गमतीदार वाटत असली तरी व्हिडीओतील घटना संतापजनक आहे. एका युजरने लिहिले की, “रील का जादू”, दुसऱ्या युजरने लिहिले की, “भारतीय रेल्वे आता एक पाऊल पुढे गेली आहे.” अशाप्रकारे युजर्स व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स करत आहेत.