Mumbai Local Train : मुंबईसाठी लोकल हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमधून दरदिवशी हजारो लोक प्रवास करतात. या मुंबई लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांचा एक समुह लोकल ट्रेनमध्ये भजन गीत गाताना दिसत आहे. त्यांचे हे भजन ऐकून तुम्हीही दंग व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तबल्याच्या तालावर एक व्यक्ती भजन गीत गाताना दिसत आहे आणि त्यांच्या आजुबाजूला असणारे मंजीरा वाजवून त्यांना सुर देत आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे सर्व “एकवीरेची पाहत होते वाट..” हे सुरेख भजन गीत गात आहेत. त्यांचा सुमधूर आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
हा एकच व्हिडीओ नाही तर असे अनेक व्हिडीओ आहे. त्यात ते लोकलमध्ये भजन गीत गात आहेत. लोकलमध्ये भजनाची ही अनोखी परंपरा ही लोक जपत आहेत. त्यांच्या या स्तुत उपक्रमाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहेत.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा : “लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड…” बायकोचा उखाणा ऐकून नवरा चक्क लाजला, व्हिडीओ एकदा पाहाच…

suhas_bandagale_19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या अकाउंटवर लोकल ट्रेनमधील असे अनेक भजनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “अशा माणसांमुळेच आपल्या रुढी, परंपरा टिकून आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ बघून सगळं टेन्शन गेलं” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा सुख सोहळा स्वर्गी नाही”

Story img Loader