Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांचा एक आधार आहे. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीत उभं राहून धक्काबुक्की सहन करीत शाळा, कॉलेज, ऑफिस गाठतात. आज अनेक लहान-मोठ्या फेरीवाल्यांचे पोट या मुंबई लोकलवर अवलंबून आहे. तसेच मायानगरी मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठीदेखील लोकल ट्रेनचा प्रवास एक आकर्षणाचा भाग आहे. हा मुंबई लोकलचा प्रवास अनेकांना आपलंसं करून घेतोय. रोजच्या गर्दीमुळे आता अनेक मुंबईकरांना रोजचा लोकल प्रवास नकोसा वाटू लागलाय; पण पोटापाण्यासाठी आणि शिक्षणासाठी नाईलाज म्हणून मुंबईकरांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे मुंबई लोकलचा प्रवास करताना काय हाल होतात हे फक्त एक मुंबईकरच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. याच मुंबई लोकलच्या जीवघेण्या प्रवासाचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात मुंबईकर कशा प्रकारे जीवावर उधार होऊन प्रवास करतायत हे दिसतंय.

नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईत येणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ पाहून इथे येण्याआधी करा १०० वेळा विचार

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गर्दीच्या वेळी मुंबईकर ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करीत असल्याचं धडकी भरवणारं दृश्य आहे. पण, हेच मुंबईकरांचं रोजचं जीवन आहे. कितीही गर्दी असो, धक्काबुक्की होवो; पण काही झालं तरी हात सुटला नाही पाहिजे. जो रोज अशा प्रकारचा प्रवास करू शकतो, तोच या मुंबईत टिकू शकतो, आपलं आयुष्य घालवू शकतो, अशी सध्याची परिस्थिती विशद करून सांगणारं हे प्रातिनिधीक दृश्य आहे. कारण- लोकल प्रवास ही रोजची तारेवरची कसरत असते. त्यामुळे मुंबईत नोकरी-धंद्यानिमित्त येणाऱ्या लोकांनी हे दृश्य पाहून इथे येण्याआधी १०० वेळा विचार करावा.

Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू
Shocking video sister makes reel in front of brothers corpse consoles bhabhi video viral
“अरे जरा तरी लाज वाटू द्या” मागे भावाचा मृतदेह, वहिनी धाय मोकलून रडतेय अन् नणंद रिल्स बनवण्यात व्यस्त; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking video Mumbai Local Women Fought With Each Other At Dombivli Railway Station
“महिलांना आता पुरूषांची नाही महिलांचीच भिती” डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील खतरनाक VIDEO होतोय व्हायरल
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
unknown girl gave flowers
‘भावाची विकेट पडली ना राव’ अनोळखी तरुणीनं दिलं फुल अन् तो लाजला; VIDEO पाहून तुम्हालाही विश्वास बसेल लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

काही झालं तरी हात सुटू देत नाहीत

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी गच्च भरलेली मुंबई लोकल ट्रेन पटरीवरून वेगानं धावतेय. यावेळी ट्रेनच्या दरवाजावर लटकून असंख्य प्रवासी प्रवास करतायत. यावेळी चुकूनही एकाचा जरी हात सुटला तरी तो जीवाशी मुकू शकतो. पण, याबाबत अधिक विचार न करता अनेक मुंबईकर रोज अशा प्रकारे प्रवास करतायत. व्हिडीओत कॉलेजला जाणारे चार ते पाच तरुण दिसतायत, तेही ट्रेनमध्ये चढण्यास जागा न मिळाल्यानं दरवाजात धोकादायक पद्धतीनं लटकून प्रवास करतायत. एक हात आणि एका पायावर तोल सांभाळत ते उभे आहेत. मुंबईकरांसाठी हे काही नवीन नाही. रोज अशाच प्रकारे अनेक मुंबईकर वेळेत आपलं कॉलेज, ऑफिस किंवा कामाचं ठिकाणं गाठण्यासाठी नाइलाजानं असा जीवघेणा प्रवास करतात; पण काही झालं तरी हात सुटू देत नाहीत.

mumbai local train video
मुंबई लोकल ट्रेन व्हायरल व्हिडीओ (फोटो – pranaveditz__/ insta)

“मुंबई आहे इथे रोज जीवाशी खेळून कामावरती जावं लागतं” युजरची कमेंट

मुंबई लोकल प्रवासाची सध्याची परिस्थिती दाखवणारा हा व्हिडीओ pranaveditz__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेक जण कमेंट्स करून मुंबई लोकल प्रवासाचे अनुभव सांगत आहेत. एकानं लिहिलं की, भावा, ही मुंबई आहे इथे रोज जीवाशी खेळून कामावरती जावं लागतं. दुसऱ्यानं लिहिलंय की, ये है मुंबई मेरी जान. तिसऱ्यानं लिहिलंय की, जबाबदारीचा हात आहे. तर अनेकांनी मुंबईकरांना अशा जीवघेण्या पद्धतीनं प्रवास न करण्याची विनंती केली आहे.

Story img Loader