Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांचा एक आधार आहे. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीत उभं राहून धक्काबुक्की सहन करीत शाळा, कॉलेज, ऑफिस गाठतात. आज अनेक लहान-मोठ्या फेरीवाल्यांचे पोट या मुंबई लोकलवर अवलंबून आहे. तसेच मायानगरी मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठीदेखील लोकल ट्रेनचा प्रवास एक आकर्षणाचा भाग आहे. हा मुंबई लोकलचा प्रवास अनेकांना आपलंसं करून घेतोय. रोजच्या गर्दीमुळे आता अनेक मुंबईकरांना रोजचा लोकल प्रवास नकोसा वाटू लागलाय; पण पोटापाण्यासाठी आणि शिक्षणासाठी नाईलाज म्हणून मुंबईकरांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे मुंबई लोकलचा प्रवास करताना काय हाल होतात हे फक्त एक मुंबईकरच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. याच मुंबई लोकलच्या जीवघेण्या प्रवासाचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात मुंबईकर कशा प्रकारे जीवावर उधार होऊन प्रवास करतायत हे दिसतंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा