Mumbai Rains Local Train Video: मुंबईला पावसाने झोडपून काढलं असतानाही मुंबईकर चाकरमान्यांना ऑफिसला जाण्यापासून काही सुटका मिळत नाही. बहुतांश वेळा मुंबईकरांचं स्पिरिट अशा नावाखाली प्रवाशांना ट्रेनमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. असाच एक मुंबई लोकलचा सुपरमॅन व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी लोकल ट्रेनची सेवा पार कोलमडून पडली आहे. तर जिथे ट्रेन सुरु आहेत तिथे स्टेशनवर प्रवाशांची तिन्ही त्रिकाळ प्रचंड गर्दी आहे. अशावेळी जीव मुठीत घेऊन काही जण ट्रेन पकडण्याचं धाडस करतात. याच धाडसाचं प्रतिनिधित्व करणारा एक व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण जनरल डब्यात चढण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहे. गर्दीचा वेग आणि ताकद इतकी प्रचंड आहे की वादळ आल्याप्रमाणे हा तरुण चक्क ट्रेनच्या दाराला लटकून बाहेर फेकला जात आहे. गमतीचा भाग म्हणजे एवढं होऊनही हा तरुणही दार सोडायचं नाव घेत नाही, यावरून अनेकांनी त्याला वाह्ह सुपरमॅन असंही म्हटलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताना अनेकांनी मनोमनी आपल्या बॉसला टॅग केलं आहे. “आमच्याही कंपनीत वर्क फ्रॉम होमची सोय असताना एवढा जीव धोक्यात घालून ऑफिसला बोलावतात, यांना लोकलचा प्रवास खाऊच वाटतो” अशा भावना दुःखी नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये मांडल्या आहेत. काहींनी हाच व्हिडीओ मीम बनवून शेअर करताना “आम्ही सुद्धा असंच एका कॉलवर होऊ शकेल असं काम बघायला दोन- तीन तास प्रवास करून ऑफिसला जातो” असंही लिहिलं आहे.

मुंबई लोकल व्हायरल Video

निदान हे व्हिडीओ पाहून तरी बॉस मंडळी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देतील अशी अपेक्षा