Mumbai Local Train Video : आज लाखो मुंबईकरांसाठी मुंबई लोकल एक मोठा आधार आहे. रोज अनेक प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करतात. पोटपाणी, शिक्षण यांसाठी धक्काबुक्की सहन करीत शाळा-कॉलेज, नोकरी-धंद्याचे ते ठिकाण गाठतात. मायानगरी मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्यांना मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास म्हणजे एक आकर्षणाचा भाग असतो. मात्र, रोज प्रवास करणाऱ्यांना आता तो प्रवास नकोसा आणि जीवघेणा वाटत आहे. कारण- आजच्या घडीला मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास हा अनेकांना सर्वांत धोकादायक गोष्ट वाटतेय. कारण- रोज वाढत चाललेली गर्दी पाहून काळजात धडकी भरतेय. कामाच्या वेळेत मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढणे अवघड वाटू लागते. त्यामुळे लोकलचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता खूप संघर्ष करावा लागतोय. सध्या मुंबई लोकल ट्रेनबाहेरील एका प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक प्रवासी अतिशय जीवघेण्या पद्धतीने प्रवास करताना दिसतोय. अनेकांनी, या प्रवाशाची मजबुरी फक्त विरारकरच समजू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही कधी सकाळच्या वेळात विरारहून सुटणाऱ्या ट्रेनने प्रवास केला असेल, तर तुम्हाला प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे ठाऊक असेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना नीट उभं राहण्यासाठी जागा मिळणे तर सोडाच, पण आत शिरण्यासाठीदेखील जागा दिली जात नाही. अशा परिस्थितीत अनेकांना रोज नोकरी-धंद्याचे ठिकाण वेळेत गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. रोजचा लेटमार्क अनेकांना परवडणारा नसतो आणि त्यामुळे प्रवासी अतिशय जीवघेण्या पद्धतीने प्रवास करत आपले स्थान गाठतात. या व्हिडीओतही तेच दिसतेय. एक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी जागा न मिळाल्याने ट्रेनच्या डब्यामागील लोखंडी रॉडवर लटकून जीवघेणा प्रवास करतोय. जीवापेक्षा जबाबदारीचं ओझे मोठे असल्याने तो अशा प्रकारे प्रवास करतोय.

“जीवापेक्षा जबाबदारीचे ओझे”`

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वे प्लॅटफॉर्मवरून एक ट्रेन पास होताना दिसतेय. यावेळी एका ट्रेनच्या डब्यामागे एक प्रवासी लटकून उभा असल्याचे दिसतेय. हा प्रवासी धावत्या ट्रेनच्या डब्यामागील लोखंडी रॉडवर उभा राहून प्रवास करतोय. यावेळी जराही तोल गेला किंवा हात निसटला, तर त्याच्या जीवावर बेतू शकतं; पण जीवापेक्षा जबाबदारीच्या ओझ्यामुळे तो अशा प्रकारे प्रवास करतोय, असे मत अनेकांनी कमेंट्समध्ये मांडलेय.

हा व्हिडीओ @nallasopara.memes नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो विरार-चर्चगेट लोकलचा असल्याचे लिहिले आहे. एकाने लिहिलेय की, प्रत्येकाची मजबुरी असते. दुसऱ्याने लिहिलेय की, हे दृश्य हास्यास्पद नाही, तर खूप दु:खद आहे. तरीही रेल्वे प्रशासनाला सर्व ट्रेन्स एसी करायच्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train video virars passengers risk lives hanging on running viral trains watch dangerous video sjr