Mumbai News : लोकल ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते. याच लाईफलाईनमधून काही लोक जीवघेणा प्रवास करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकलच्या महिला डब्यातील काही महिला जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी खास डब्बे आहेत. या डब्ब्यांमध्ये फक्त आणि फक्त महिला प्रवास करू शकतात. महिलांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेल्या एका महिला डब्ब्यातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चालत्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात भयंकर गर्दी आहे. काही महिला लोकल ट्रेनच्या दरवाज्यात लटकून प्रवास करताना दिसत आहे. या महिला अगदी काठावर उभ्या आहेत. यांचा थोडा जरी तोल गेला तरी त्या खाली पडू शकतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही शहारा येऊ शकतो.

हेही वाचा :

mumbai_journal या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खरंच हा मुर्खपणा आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train women standing dangerously close to the door of train video goes viral ndj