Mumbai Train: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनने अनेक प्रवासी प्रवास करतात. पण जर सकाळ आणि सायंकाळची वेळ असेल तर चाकारमाण्यांची तोबा गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून येते. अशात जर सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

लाईफलाईन की मृत्यूचा सापळा?

लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. वेळेत ऑफिसला जाणाच्या गडबडीत प्रत्येक जण ठरलेली लोकल पकडण्याचा घाईत असतो. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच मुंबईच्य लोकल ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबईच्या लोकलमधील महिलांचा हा डबा आहे. या महिलांच्या डब्यात खच्चून गर्दी आहे. इतकरी गर्दी आहे की, ५, ६ महिला अक्षरश: लोकलच्या बाहेर लटकत आहेत. या महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातील एका महिलेने जरी थोडीशी हालचाल केली तरी सगळ्या लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: लिफ्टमध्ये अडकले माय-लेक, इंदोर पोलिसांनी दोन तासांनंतर केली सुखरुप सुटका

लोकल ट्रेनमधून रोज जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य हार्बर पश्चिम मार्गावरुन जाणार्‍या लोकल रेल्वे गाड्या सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात. त्यामुळे नाईलाजाने काही प्रवासी लोकल रेल्वेच्या दरवाज्यात लटकून प्रवास करतात तर काही तरुण स्टंट म्हणून रेल्वेच्या टपावरुन प्रवास करतात. त्यामुळे या जिवघेण्या रेल्वे प्रवासात अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीव जातो