Mumbai local dance video: मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, मात्र आता महिलांच्या डब्यातून समोर आलेला व्हिडीओ हा अगदी याच्या उलट आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये मकरसंक्रातीनिमित्त लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं गाण्यावर थिरकायला लागाल.

पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी १४ जानेवारीला आपण मकर संक्रात साजरी करतो. याचनिमित्तानं या सर्व महिला काळ्या रंगाच्या साड्या नेसून लोकलमध्ये आल्या आहेत. यावेळी या महिलांनी लोकलमध्येच एक भन्नाट डान्स केलाय. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची या मराठी ट्रेंडींग गाण्यावर या महिलांनी डान्स केला. या महिलांच्या स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हा. विशेष म्हणजे धावत्या लोकलमध्ये त्यांनी हा डान्स केला. सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न या महिलांनी केला. हे गाणंही सध्या ट्रेंडिंगवर आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.

Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Shocking video of Dog saved girls life from kidnaper viral video on social media
कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण चार जणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. प्रत्येकीने साडी नेसली असून चालत्या लोकलमध्ये या महिला थिरकताना दिसत आहेत. यावेळी या महिला जराही तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या महिलांचं कौतुक करत आहेत. या ठिकाणी लोकल थोडीफार रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या महिलांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ या तरुणींचा व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sawantvibhuti911 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या महिलांचं घर संसार सांभाळून आपली आवड जपत असल्यामुळे कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय धावत्या रेल्वेत सर्वांसमोर डान्स करायला धाडस लागतं, असं म्हणत अनेकांनी डान्सला दाद दिली आहे

Story img Loader