Mumbai local Viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही महिलांनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं थिरकायला लागाल.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, अशाच काही महिलांच्या डान्स व्हिडीओची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे.मुंबई राणी अर्थात मुंबई लोकल ट्रेन. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. लोकलमधून प्रवास करताना प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला अनेक अनुभव मिळतात. कुठे प्रवाशांमध्ये छोट्या कारणावरुन हाणामारी? तर कुठे चक्क पुरुषांच्या कंपार्टमेंटमध्ये भजनाचा माहोल. सध्या सोशल मीडियावर असाच एक मुंबई लोकलमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलांनी “त्या नटीनं मारली मिठी मला गं त्या नटीनं मारली मिठी ” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत.
पाहा व्हिडीओ
अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर sawantvibhuti91 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे.