Mumabi Local Baipan Bhari Deva Video: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर वर्षाचे ३६५ दिवस २४ तास नेहमीच गर्दी असते. अगदी दुपारच्या वेळी वगैरे तुम्हाला क्वचित ट्रेन पूर्ण रिकामी आहे असं दृश्य पाहायला मिळू शकतं.पण त्यातही आता गणेशोत्सव किंवा अन्य सणांचे दिवस सुरु असतील तर नवश्या गवश्यांची गर्दी होतेच. पण आता अशाच एका चर्चगेट- बोरिवली लोकल ट्रेनमधील महिलांचा एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला पाहून सगळ्या मुंबईकरांना एकच प्रश्न पडू शकतो तो म्हणजे “मुंबई लोकलमध्ये खरंच एवढी जागा असते का?”
तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये काही महिला अत्यंत सुंदर नऊवारी साड्या नेसून लोकलमध्ये झिम्मा- फुगड्यांचा खेळ खेळत आहेत. केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही असे म्हणायला लावणारा असा हा व्हिडीओ आहे. महिलांनी बाईपण भारी देवाच्या मंगळागौरीच्या गाण्यावरच लोकलमध्ये सुंदर व्हिडीओ बनवला आहे. यापूर्वी सुद्धा असे काही छोटे क्लिप्स व्हायरल झाले होते पण बहुधा रीतसर मंगळागौरीचा पोशाख करून ट्रेनमध्ये असं सादरीकरण करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
Video: मुंबई लोकलमध्ये मंगळागौर
हे ही वाचा<< नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहते म्हणतात, “तिने सिद्ध केलं प्रेमाला..” नीट वाचा पोस्ट
दरम्यान, श्रावण सरून आता गणपती बाप्पाचं आगमन झालं असलं तरी मंगळागौरीचे क्रेझ कायम आहे, विशेष म्हणजे गणेशोत्सावात आज ज्येष्ठा गौरी आवाहन होणार आहे त्यासाठी सुद्धा अनेकांनी बाईपण भारी देवाच्या साड्यांचा, दागिन्यांचा लुक केला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी काही छान सजावट केली असेल तर त्याचे फोटो लोकसत्ताच्या ‘घरचा गणेश’ पेजवर अपलोड करायला विसरू नका. अगदी सोप्या स्टेप्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. आणि हो तोपर्यंत ही लोकलची मंगळागौर कशी वाटली हे कमेंट करून कळवा.