Mumbai Local Viral Video: मुंबई लोकल मध्ये सुख-दुःखाचा खजिना असं म्हणतात, ते नेमकं का? या प्रश्नाचं उत्तर एका व्हिडिओच्या रूपात सध्या व्हायरल होत आहे. मुंबई लोकलमध्ये एकमेकींशी कचाकच भांडणाऱ्या बायका हे खरं सांगायचं तरी अगदी योग्य विधान आहे त्यात काहीच अतिशयोक्ती नाही. पण याच बायका वेळप्रसंगी आपल्याच मैत्रिणींसाठी सगळा ताण- थकवा विसरून गर्दीतही आनंद साजरा करतात हे तुम्हाला माहित आहे का? अलीकडे ब्रायडल शॉवर किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर पाश्चिमात्य केळवण हा लग्नाचा अविभाज्य भाग बनला आहे. असंच एक केळवण सध्या मुंबई लोकलमध्ये आयोजित केलं गेलं होतं. एका नशीबवान तरुणीच्या मैत्रिणींनी भरगर्दीत कशाचीही कसर न ठेवता तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@localtrain. Girl या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला भरगर्दीत सुरुवातीला फुगे फुगवताना दिसत आहेत. गर्दीवरून साधारण ही संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतरची वेळ असावी असं वाटतंय. व्हिडीओ पुढे जातो तसं नवरीबाईंचं दर्शनही होतं. छान ड्रेस व डोक्यावर राणीसारखा मुकुट घालून आपल्याला मैत्रिणींना आणलेला केक कापताना नवरी दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये, “आमची नवरी” असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. जो आता इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई लोकलमध्ये रंगलं ब्रायडल शॉवर

हे ही वाचा << मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा असला तरी यात मुंबईचं, लोकलचं, महिलांचं, मैत्रीचं व अशा असंख्य शब्दांपलीकडच्या भावनांचं दर्शन खूप सुंदर घडतंय. तुम्हाला हा व्हिडीओ बघून नक्कीच तुमच्या ग्रुपची आठवण आली असेल ना? मग त्यांच्यासह लिंक शेअर करायला विसरू नका. तुमचेही असे काही सुंदर किस्से असतील तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा.