Mumbai Local Girl Viral Video: मुंबई लोकलमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने आजवर अनेकजण स्टार क्रिएटर झाले आहेत. त्यामुळेच कदाचित काहींना आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी हा फंडा वापरण्याची भुरळ पडते. अशीच भुरळ सोफी या परदेशी तरुणीला सुद्धा पडली आणि तिने मुंबई लोकलमध्ये जनरल डब्यात भरगर्दीत शिरून दोन व्हिडीओ बनवले. अर्थात तिच्या या फंड्याने काम केलं आणि तिचा व्हिडीओ अपेक्षेनुसार व्हायरलही झाला पण यामुळे तिने अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. ‘मुंबई की रानी’ अशी स्वतःची ओळख सांगणारी सोफी एका बॉडीकॉन ड्रेसमध्ये मुंबईच्या लोकलमध्ये चढली होती. तिचा एक व्हिडीओ जनरल डब्यात फक्त उभं राहुन शूट केलेला आहे तर एकामध्ये ती ट्रेनमधून उतरताना दिसते. अन्य एका व्हिडीओमध्ये ती ट्रेनच्या खांबाला लटकून बाहेर वाकलेली दिसतेय. खरं पाहायचं तर तिन्ही व्हिडीओमध्ये घडत असं काहीच नाही पण तिचा हा लक्ष वेधून घेण्याचा अनावश्यक प्रयत्न नेटकऱ्यांचा पारा वाढवतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@sofibile या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हे प्रोफाइल पाहता व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचंच हे अकाउंट आहे हे स्पष्ट होतं, यावर तब्बल ३९ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिने मुंबई लोकलमध्ये उभं राहून बनवलेल्या व्हिडीओला अडीच मिलियन, ट्रेनमधून उतरतानाच्या व ट्रेनच्या खांबाला लटकून बाहेर वाकून बघतानाच्या क्लिपला प्रत्येकी ४.२ मिलियन व्ह्यूज आहेत. एकूण १ कोटीहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या व्हिडीओजवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

टीकाकारांचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे, महिलांसाठी आरक्षित डब्बा असताना तुला जनरल डब्ब्यात गर्दीच्या वेळी चढून जागा अडवण्याची काय गरज होती? दुसरा आक्षेप म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अंतर्वस्त्र परिधान न करता असे कपडे घालून, इतरांना ओशाळवाणे वाटेल असं वागणं किती बरोबर आहे? तिसरा आक्षेप म्हणजे गर्दीच्या वेळी एवढा स्लोमोशन व्हिडीओ बनवताना इतरांचा खोळंबा करणे हे योग्य आहे का? चौथा आक्षेप असा आहे की, ट्रेनच्या बाहेर लटकून पाहताना जर तिला काही झालं असतं किंवा तिला वाचवतना इतरांना काही दगाफटका झाला असता तर त्याची जबाबदारी कुणाची? यातील पहिले दोन आक्षेप अर्थातच तिच्या निवडीवर आहेत पण अन्य दोन आक्षेप हे योग्य असून त्यावर रेल्वेने काहीतरी कारवाई करणे आवश्यक आहे अशा आशयाच्या अनेक कमेंट्स सुद्धा या व्हिडीओखाली आहेत.

हे ही वाचा<< तुमची प्रिय व्यक्ती घरी वाट बघत आहे; प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये अडकला तरुणाचा पाय…प्रवाशांनो थरारक VIDEO पाहाच

एका युजरची प्रातिनिधिक कमेंट पाहायला गेल्यास, यात असे लिहिले आहे की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते , तुम्हाला कदाचित काही काम नसेल पण जे लोक ट्रेनने प्रवास करतात ते सर्वात कष्टकरी असतात. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी जीवाचं रान करत असतात, तुम्ही ज्या प्रकारे ट्रेनमधून बाहेर पडत आहात हा प्रकार इतरांचा वेळ वाया घालवणारा आहे .अशा फालतू गोष्टी करणे थांबवा आणि तुम्ही प्रवास करू इच्छित असाल तर कृपया महिलांसाठी आरक्षित डब्याचा वापर करा.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local women in tight nude color bodycon dress tries to get attention people slams calling her jobless video gain 1 crore views svs