Tribute to ratan tata in mumbai local Train : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भारतातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती, खेळाडू, कलाकार मुंबईत दाखल झाले होते. तर, अनेकांनी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दु:ख व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. याचदरम्यान आता मुंबई लोकलनेही उद्योगपती रतन टाटा यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये जाहिरातीसाठी अनेक एलईडी स्क्रीन लावलेल्या आहेत. त्याच स्क्रीनवर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहणारा फोटो झळकताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यात रतन टाटा आणि मुंबईचे अतूट नाते राहिले. रतन टाटांनी मुंबईवर भरभरून प्रेम केले, मुंबईसाठी त्यांनी नेहमीच भरीव योगदान दिले. त्यामुळे मुंबईकर रतन टाटांना कधीच विसरू शकत नाहीत. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आता मुंबई लोकलकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read More Ratan Tata Relates News : रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो

मुंबई लोकलमधील हा फोटो aamchi_mumbai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा फोटो पाहून, त्यावर अनेकांनी कमेंट्स करीत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Latest News : Ratan Tata Lifestyle : रतन टाटा तरुणपणी कसे दिसायचे? पाहा त्यांचे ‘हे’ १० दुर्मिळ फोटो अन् त्यामागच्या आठवणी

रतन टाटांनी आपल्या हयातील अनेक समाजपयोगी कार्ये केली. टाटा हॉस्पीटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅन्सरपीडितांना जगण्याची नवी उमेद दिली. यासह नेहमीच त्यांनी भारतीयांचा विचार केला आणि त्याप्रमाणे ते कार्य करीत राहिले. रतन टाटा यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होता. व्यवसाय करताना त्यांनी आपल्या माती आणि मानवतेशी असलेल्या नात्यात कधी अंतर येऊ दिलं नाही. त्यामुळे आज त्यांच्या जाण्यानं देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai locals train pay tribute to ratan tata emotional photo viral on social media sjr