Mumbai Car Accident video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.

लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील कारने टॅक्सीला समोरुन धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यात टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूक झाला आहे. टॅक्सीतील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ड्रायव्हरची अवस्था पाहून तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टॅक्सीचा चेंदामेंदा झाला असून त्यामध्ये ड्रायव्हर अक्षरश: अडकला आहे. यावेळी त्याचं डोकं एकीकडे तर हात-पाय एकीकडे अडकल्याचं दिसत आहे.

अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. त्यात वाहनांचा वेग जास्त असल्यानं अपघाताची तीव्रता वाढली असावी असं सांगितलं जात आहे. अपघाताची भीषणता अंगावर काटा आणणारी आहे. ज्या परिसरात हा अपघात घडला तिथं आजूबाजूला अनेक बड्या कंपन्यांची कार्यालयं आहेत. लाखो कर्मचारी या ठिकाणी कामासाठी येत असतात. पण आज शनिवार असल्यानं नेहमीपेक्षा वर्दळ कमी होती आणि रस्ताही तसा मोकळा होता. घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं हे पाहण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासलं जाणार असल्याचं समजत आहे. त्यातून अपघाताची नेमकी माहिती समोर येऊ शकेल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pintu_ka_chashma नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.