Mumbai Local Train Viral Video : आलिशान हॉटेल्स, बहुमजली इमारती, झोपडपट्ट्या, झोपडपट्ट्यांनी खचाखच भरलेली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची गर्दी इतर शहरातील गर्दीपेक्षा वेगळी आहे. या गर्दीत प्रत्येक व्यक्ती एकटा आणि स्वतंत्र दिसतो. इथे सोबत चालणारी माणसं पुढच्या क्षणी एकटे राहण्याची सहज तयारी करून भेटतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबईमधली गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. याआधी मुंबई लोकलसंदर्भात अनेक व्हिडीओ तु्म्ही पाहिले असतील परंतु आता लोकांनी रेल्वे ट्रॅकवरच संसार थाटला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

माहिम जंक्शनवरच्या या व्हिडीओनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईत लोक वेगवेगळ्या राज्यातून पैसे कमावण्यासाठी येतात. अनेकदा तर रस्त्यावर झोपडी बांधून, कधी रेल्वे ट्रॅकवर, प्लॅटफॉर्मवर राहतात. तिथेच झोपतात. असाच एक रेल्वे ट्रॅकवर राहणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकांनी रेल्वे ट्रॅकवरच तंबू ठोकले आहेत. तिथेच ते ज्वण बनवताना दिसत आहे. कपडे वाळत घातले आहेत. कोणी जुगार खेळतंय तर कुणी निवांत रेल्वे टेरॅकवर झोपलेलं दिसतंय. अशातच लहान मुलेही ट्रॅकवर खेळताना दिसत आहेत.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ८३ हजाराचा कुत्रा चोरला; महिलेनं कारच्या बोनटवर बसून केला चोरांचा पाठलाग; VIDEO चा शेवट पाहाच

हा व्हिडीओ Aamchi Mumbai या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘चोर, गुन्हेगार, दहशतवादांची नवीन कॉलनी तयार होत आहे’. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. मुंबई लोकलमधून रोज ८० लाख प्रवासी प्रवास करतात. यात ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी जलद आणि धीम्या लोकल मिळून सुमारे ९०हून अधिक लोकल धावतात. 

Story img Loader