सोशल मीडियावर सतत चर्तेत असणाऱ्या ‘वडा पाव गर्ल’उर्फ चंद्रिका दीक्षितला काही दिवसांपूर्वीच बिगबॉस ओटीटी ३मध्ये एँट्री मिळाली आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या चंद्रिकाचे अनेक चाहते आहे. अशाच एका चाहत्यांने तिचा टॅटू आपल्या हातावर काढला आहे. सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. दरम्यान वडपाव गर्लचा टॅटू काढल्यामुळे तरुणाला खूप ट्रोल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फूड व्लॉगर अमित जिंदालने यांनी सैनिक विहारमध्ये स्ट्रीट फूड सर्व्ह करताणाऱ्या चंद्रिकाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीची ‘वडा पाव गर्ल’ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अधिकाऱ्यांनी तिचा स्टॉल काढण्याची धमकी दिल्याचा दावा करून तिने लवकरच वादाला तोंड फोडले. चंद्रिकाने डॉली चायवालासह इतर अनेक सोशल मीडिया कन्टेंट क्रिएटरबरोबर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या ती ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये सदस्य म्हणून सहभागी झाली आहे.

नवी मुंबईतील एका टॅटू स्टुडिओचे मालक महेश चव्हाण यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये हा माणूस ‘वडा पाव गर्ल’चा टॅटू काढताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती त्यांच्या स्टुडिओत येतो आणि रिसेप्शनिस्टला सांगतो की, “त्याला चंद्रिकाचा टॅटू काढायचा आहे कारण ती त्याची “गुरू” आहे. महेशला मात्र असा टॅटू बनवण्याच्या त्या माणसाच्या निर्णयाचा धक्काच बसला. अधिक चौकशी केल्यावर त्याने महेशला सांगितले की, “सहा महिन्यांपूर्वी तो बेरोजगार असताना चंद्रिका हीच त्याची प्रेरणा होती.

हेही वाचा – टीव्हीवर लाईव्ह बातम्या सांगत होती पाकिस्तानी महिला पत्रकार, तेवढ्यात बैलाने…..; Video होतोय तुफान Viral

चंद्रिकामुळे त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने वडा पाव स्टॉल देखील सुरू केला आणि ती ‘बिग बॉस ओटीटी ३’ जिंकेल असा विश्वास आहे.

दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘वडा पाव गर्ल’ टॅटू काढल्याबद्दल त्या व्यक्तीला क्रूरपणे ट्रोल केले. अनेकांनी सांगितले की,”त्याला लवकरच “कव्हर-अप टॅटू” काढावा लागेल असे म्हटले.

हेही वाचा – पुणे तिथे काय उणे! प्रवाशांच्या गर्दीमुळे चक्क मेट्रोही पडली बंद, Video होतोय तुफान Viral

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये भाग घेण्यापूर्वी इंडिया टुडेला माहिती देताना चंद्रिका दीक्षितने तिच्या प्रवासाबद्दल खुलासा केला: “लोक आता फक्त मी व्हायरल होत आहे म्हणून मला पाहत आहेत, परंतु मी २७ वर्षे काम केले आहे. मी बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे. एक काळ असा होता की माझ्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते. आम्ही लंगरमध्ये जेवलो आहोत, आणि आमच्या आई-वडिलांनी मदतीशिवाय जगलो आहोत. व्हायरल होण्यासाठी मी माझा व्यवसाय कधीच सुरू केला नाही. मला फक्त माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पैसे कमवायचे होते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai man brutally trolled for getting tattoo featuring vada pav girl video snk