मुंबईचे रहिवासी असलेल्या दिनेश उपाध्याय नावाच्या व्यक्तीने तोंडात २२ पेटत्या मेणबत्त्या धरून नवीन विक्रम रचला. त्यामुळे त्यांच्या नावाचा समावेश गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे. दिनेश व्यवसायाने शिक्षक आहेत आणि याआधी ८९ विश्वविक्रम आपल्या नावे जमा असल्याचं ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या नावे ५७ लिम्का बुक ऑफ रेकॉर्डदेखील असल्याचा दावा त्यांनी केला. तोंडात २२ पेटत्या मेणबत्त्या पकडून त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं. दिनेश यांनी आपला व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. पण त्याचबरोबर हा धोकादायक स्टंट न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : दोन कांगारुंमध्ये अशी झाली मारामारी

दिनेश यांना ‘मॅक्सी माऊथ’ या टोपणनावानंही ओळखलं जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते योग करत आहे. योगविद्येमुळेच आपण अनेक विश्वविक्रम सहज करू शकतो असं ते सांगतात. एकाचवेळी जळत्या मेणबत्त्या तोंडात पकडून त्यांनी विश्वविक्रम साधला असला तरी कोणीही हा स्टंट न करण्याचं आवाहन त्यांनी केलं, कारण यामुळे चेहऱ्याला गंभीर ईजा होण्याची शक्यता अधिक आहे. गिनिझ बुकच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. याआधी दिनेश यांनी एका मिनिटांत ७४ द्राक्षं खाण्याचा विक्रम साधला होता.