मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली असून, मुंबईकरांना आता या मेट्रोतून भुयारी मार्गिकेवरून वेगवान प्रवास करण्याची प्रतीक्षा आहे. धावत्या मेट्रोच्या ड्रायव्हरच्या केबिनमधून दिसणार्‍या बोगद्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ट्रेनच्या आतील भागाच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाची झलक यामध्ये पाहायला मिळाली. या व्हिडीओतून मेट्रोचा भुयारी मार्ग नेमका कसा आहे, हे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो ३ या राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. मात्र, मेट्रोच्या आरे कारशेडला विलंब झाल्यामुळे ही मार्गिका पूर्ण होण्यास वर्षभराचा विलंब झाला आहे. सध्या या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबरमध्ये या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यानुसार मार्गिकेचे भुयारीकरण १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.बहुप्रतीक्षित मेट्रो- ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी रविवारी पार पडली.

मेट्रो ट्रेनने एमआयडीसी ते विद्यानगरी या आठ किलोमीटर मार्गावरील सहा स्थानके पार केली. त्यानंतर सीप्झ स्टेशनवर परत येत मेट्रोने जवळपास १७ किमी अंतराची चाचणी पूर्ण केली. आरे ते कफ परेड कॉरिडॉर अर्थात, एका लाईनचा पहिला टप्पा असलेल्या आरे आणि वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसीदरम्यान मेट्रो लवकरच सुरू होईल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुटुंब संपलं; पण तो एकटा वाचला! अफगाणिस्तानातील भूकंपाचे वास्तव दाखवणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या पोस्टला हजारो लाइक्स आणि शेकडो शेअर मिळाले होते. एकीकडे बांधकाम वेगात सुरू असताना दुसरीकडे एमएमआरसीकडून पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाड्या मुंबईत आणण्याच्या कामासही वेग दिला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro 3 gets 8 km underground trial run services to start by year end mumbai metro underground video viral srk
Show comments