Mumbai Metro Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. मेट्रोचे तर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातही खास करून दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ असतात. कधी सीटसाठी प्रवाशांमधील भांडणं, रोमँटिक सीन, कपल्सचे अश्लील चाळे, कधी डान्स तर कधी चित्र विचित्र करामतींमुळे दिल्ली मेट्रो चर्चेत असते. पण, आता दिल्लीकर नाही, मुंबई मेट्रो चर्चेत आली आहे, त्यामागील कारणही तसेच आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोत अचानक असे काही घडले की, अनेकांनी आपल्या बसण्याच्या सीट्स भराभर/झटक्यात रिकाम्या केल्या नेमकं घडलं तरी काय पाहू…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील अनेक भागांत सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका मुंबई मेट्रोलादेखील बसला. मेट्रोमध्ये नुकतीच या पावसामुळे एक विचित्र घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोच्या एका डब्यामध्ये अचानक पावासाचे पाणी पडू लागले. यावेळी मेट्रोमध्ये निमयित प्रवास करणाऱ्यांची खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे ट्रेन प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. पण, या गर्दीत अचानक टपावरून पाणी कोसळू लागल्याने अनेक प्रवाशांवर सीटवरून उठून उभं राहण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत प्रवाशांची गर्दी असूनही अनेक सीट्स मात्र रिकाम्याच होत्या. मुंबई मेट्रोतील या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे पाहून युजर्सही अवाक् झालेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुंबई मेट्रोच्या एका डब्यात एसीच्या व्हेंटमधून अचानक पाणी कोसळू लागले. अशा परिस्थितीत गर्दी असूनही प्रवासी मात्र मिळेल तशी जागा करून उभे राहिले. सीटवर बसलेले अनेक प्रवासी अंगावर पाणी पडू लागल्याने उभे राहिले. या घटनेमुळे प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली, कारण आधीच गर्दी त्यात ही घटना, अशावेळी उभं राहायचं तरी कसं, असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला. पण, या परिस्थितीतही अनेक प्रवासी घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करताना दिसले.

मुंबई मेट्रोत अचानक सुरू झाला पाऊस

दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असताना आता मुंबई मेट्रोचा हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. जलद प्रवासासाठी अनेक मुंबईकर रोज मेट्रोने प्रवास करतात. अशात मुंबईत सध्या मुसळधार पाउस सुरू आहे. या मुसळधार पावसाने मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम होतोच, पण आता मुंबई मेट्रोलाही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. मेट्रोचे वेळापत्रक जरी नीट असले तरी अशा समस्यांचा सामना मात्र मुंबईकरांना करावा लागतोय, त्यामुळे अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत नेटीझन्स नेमकं काय म्हणाले?

मुंबई मेट्रोतील या घटनेबाबत आता प्रवाशांनी चिंता व गैरसोयीबाबत संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या काही लोकांनी गमतीत लिहिले आहे की, प्रवासी कदाचित म्हणत असतील की, आम्ही मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढले होते, पण आता आम्ही एका स्विमिंग पूलमध्ये आहोत. या घटनेवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहींनी या परिस्थितीवरून मुंबई मेट्रोची खिल्ली उडवली तर काहींनी मेट्रोतील ही परिस्थिती गांभीर्याने घेतली. यात अनेकांनी म्हटले की, या घटनेने हवामान आणि शहरी वाहतुकीची परिस्थिती किती आव्हानात्मक असू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता मेट्रो व्यवस्थापन लवकरच या समस्येवर तोडगा काढेल, अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Read More Latest Trending News : मुस्लीम तरुणांकडून टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर दमदाटी अन् तोडफोड; व्हिडीओ खरा; पण नेमका कुठला? वाचा सत्य घटना

सध्या मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे, त्यामुळे मायानगरीमध्येही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro viral video rain in mumbai metro shocking video shows water leakage in train compartment sjr