Local Train Viral Video: मुंबईची लोकल ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी मुंबई लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क दोन पुरुष एकमेकांशीजोरदार भांडताना दिसत आहेत.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. हे दोघेही एकमेकांची कॉलर पकडून भांडण करत आहेत. दोघेही धावत्या लोकलमध्ये अगदी दरवाजातच उभे असल्यामुळे इतर प्रवाशांना भिती वाटत आहे, दरम्यान काही प्रवासी या दोघांना थांबवण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र दोघेही एकायला तयार नाहीत. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: मित्रांच्या नादाला लागून प्रपोज करायला गेला अन् मार खाऊन आला; तरुणीनं अक्षरशः चपलेनं झोडपलं
फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर काही जण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.याचबरोबर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असेही प्रवाशांचं म्हणणं आहे. हाणामारीच चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडण्याच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे.