वेळोवेळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या विनोदी शैलीत सोशल मीडिया पोस्टद्वारे नेटीझन्सची मन जिंकली आहेत. मीम्स आणि वर्डप्ले व्यतिरिक्त, कायदा अंमलबजावणीबद्दल त्यांच्या बँड कडून सादर झालेली गाणीही खूप व्हायरल होतात. यावेळी त्यांनी एक क्लासिक हिंदी चित्रपट गाणे वाजवत एक व्हिडीओ त्यांच्या युट्युबवर शेअर केला ज्यामुळे नेटिझन्स प्रभावित झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


१९५९ च्या कर्मा चित्रपटातील प्रसिद्ध ‘ए वतन तेरे लिए’ हे गाणं सादर करत, पोलीस पुन्हा एकदा लोकांना जुन्या गाण्याची आठवण करून देण्यात यशस्वी झाले आहे. संगीताद्वारे त्यांची देशभक्ती व्यक्त करताना, मुंबई पोलिसांनी त्यांच्या सादरीकरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
लोकप्रिय मीम्समध्ये अर्थपूर्ण आणि क्रिएटिव्ह माहिती टाकल्यानंतर, पोलिस बँडने हा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यापासून सोशल मीडियावर तुफान चर्चा केली आहे. त्यांनीमध्यंतरी आयकॉनिक जेम्स बाँड थीम प्ले केली होती.


पूर्वी, तरुण पिढीसाठी प्रासंगिक असण्याच्या त्यांच्या वास्तविक शैलीमध्ये, पोलिस देखील मनी हेस्टच्या वेडात सामील झाले. त्यांनी नेटफ्लिक्स मालिका मनी हाईस्टचे थीम साँग ‘बेला चाओ’ चे एक गाणं देखील त्यांनी सादर केले होते. त्या वेळीही इतर व्हिडीओप्रमाणे या गाण्यानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक प्रचंड चर्चा निर्माण केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police band performed a watan tere liye the emotional response from netizens ttg