Mumbai Police Latest News Update : मेसेजला उत्तर दिलं नाही, तरीही काही लोकांना अनाठायी मेसेज करण्याची सवय असते. विशेषत: महिलांना अशाप्रकारच्या मेसेजला सामोरं जावं लागतं. ज्या लोकांशी ओळख नसते, अशी माणसंही त्यांना गरज नसताना मेसेज करुन नाहक त्रास देतात. त्यानंतर जे काही घडतं, त्याबद्दल मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून विनाकारण चॅटिंग करणाऱ्यांना इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या या पोस्टने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट खूप साधी आहे. पण ज्याला ही पोस्ट समजली तो नक्कीच सावध झाल्याशिवाय राहणार नाही.
या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी एकप्रकारे जनजागृतीच केली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या पोस्टला पाहून अंदाज लावू शकतो की, कुणालातरी मेसेज केला जात आहे, अनेकदा हाय असा मेसेज पाठवण्यात आला आहे. जबरदस्तीने मेसेज केल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा – Viral Video: धोकादायक ठिकाणी तरुणी गेली फोटो काढायला, प्रियकराने हात सोडताच घडलं भयंकर…
इथे पाहा पोस्ट
तर दुसरीकडे त्या मेसेजला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाहीय. त्यानंतर शेवटी एक मेसेज पाहायला मिळतोया, यामध्ये त्या व्यक्तीने समोरच्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक केल्याचं दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिलं आहे की, ती मस्त घरी जेवण करेल, तुमच्या अनाठायी काळजीची गरज नाही.
मुंबई पोलिसांचं होतंय कौतुक
या साध्या पण महत्वाचा मेसेज देणाऱ्या पोस्टवर यूजर्स मुंबई पोलिसांचं कौतुक करत आहेत. एका यूजरने म्हटलं की, नवीन समस्या आहे, तर उपायही नवीनच असला पाहिजे. तर दुसरा यूजर म्हणाला, तुमचा इंटेशन ठीक असेल, पण तुम्हाला अशाप्रकारे कोणत्याही महिलेला मेसेज केलं नाही पाहिजे. तसंच अन्य एका यूजरने प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्ह टीमचं कौतुक केलं आहे.