Mumbai police hero saved a man from local train accident: शूरवीर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. पोलिस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता आपलं काम चोख बजावत असतात. त्यांची ड्युटी म्हणजे २४ तासच असते, असं म्हणायला काही हरकत नाही.

सोशल मीडियावर पोलिसांच्या अशा कारवाईचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. परंतु, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला पोलिसांचा अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाने एका व्यक्तीला जीवघेण्या अपघातापासून वाचवले आहे.

Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of Mumbai police saved a man from train accident)

सोशल मीडियावर एका शूरवीर पोलिसाचा (Mumbai police video) व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यात ऑफ ड्युटी मुंबई पोलिस अधिकाऱ्याने गोरेगाव रेल्वेस्थानकावर एका व्यक्तीला जीवघेण्या अपघातातून वाचवले. त्याचं झालं असं की, गोरेगावमध्ये एका व्यक्तीने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, परंतु चढताना त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडला.

हेही वाचा… Optical Illusion: या वर्तुळात दोन अंकी आकडा लपलाय! ७ सेकंदात शोधू शकाल का? यावरून कळेल की…

चालत्या ट्रेनमध्ये स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या त्या माणसाला स्वत:ची शिफ्ट संपवून घरी परतणाऱ्या पी. सी. ढगे यांनी पाहिलं. पाहताच क्षणी त्यांना ही धोकादायक परिस्थिती लक्षात आली आणि लगेच त्यांनी त्या माणसाकडे धाव घेतली. पी. सी. ढगे यांनी त्या माणसाला सुरक्षितरीत्या खेचलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Goregaon station accident video) ही घटना पाहून इतर प्रवासीदेखील मदत करण्यासाठी धावून आले.

या घटनेचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ‘@mumbaipolice’ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ऑन ड्युटी ऑलवेज! पीसी बाळसो ढगे जेव्हा शिफ्ट संपून आपल्या घरी जात होते तेव्हा त्यांना गोरेगाव रेल्वेस्थानकावर चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये एक माणूस अडकलेला दिसला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पी. सी. ढगे यांनी त्या माणसाचे प्राण वाचवले”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… Amazonने चक्क दोन वर्षांनंतर केली प्रेशर कुकरची डिलिव्हरी; पोस्ट Viral होताच कंपनीने दिली प्रतिक्रिया, “आम्हाला हे…”

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comment)

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी पी. सी. ढगे यांचं कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुंबई पोलिसांना सलाम, अभिमान आहे तुमचा”, तर दुसऱ्याने “रियल हिरो” अशी कमेंट केली. एक युजर कमेंट करत म्हणाला, “तुम्ही एका माणसाला जीवनदान दिले, ग्रेट जॉब सर.” तर अनेकांनी इमोजी शेअर करत पी. सी. ढगे यांचं कौतुक केलं आहे.