Mumbai police use Barbie-Oppenheimer meme to highlight public safety : ‘ओपेनहायमर’ व ‘बार्बी’ हे दोन बहुप्रतीक्षित हॉलीवूड चित्रपट २१ जुलै रोजी एकाच दिवशी अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटांनी रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट कल्ला करणार याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जण ‘बार्बी’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत; तर काही जण ‘ओपेनहायमर’ला सपोर्ट करीत आहेत. पण दोन वेगवेगळ्या कथानकांचे हॉलीवूड चित्रपट पाहायला मिळणार याचा प्रेक्षकांना आनंद आहे.

चित्रपटांच्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर मीम्स, व्हिडीओ अन् अनेक प्रकारच्या पोस्टचा अक्षरश: पाऊस पडत आहे. काही नेटिझन्स बार्बी स्टार्ट, ओपेनहायमर एंडिंग अशा आशयाचे मीम्स शेअर करीत आनंद घेत आहेत. या ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलिसदेखील सहभागी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी या दोन्ही चित्रपटांना धरून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक हटके मीम शेअर केले आहे. ते पाहून मुंबई पोलिसांनाही हॉलीवूड चित्रपटांनी भुरळ घातल्याचे दिसतेय.

Saif Ali Khan Attacked With Knife At Home
Saif Ali khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, प्रियांका चतुर्वेदी म्हणतात, “वांद्रे येथील सेलिब्रिटी आणि….”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
director Anurag Kashyap leave Mumbai financial pressures
विश्लेषण : प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? त्याचे ‘दाक्षिणायन’ बॉलिवुडला जागे करणार का?
Jitendra Awhad
Jitendra Awhad : Video : घरावर पोलिसांची पाळत? पत्रकार परिषदेत घुसून चित्रीकरण केल्याचा आरोप; जितेंद्र आव्हाड संतापले; नेमकं काय घडलं?
anurag kashyap on kennedy not released
जगभरात गाजलेला ‘केनेडी’ सिनेमा का प्रदर्शित झाला नाही? अनुराग कश्यप नाराजी व्यक्त करत म्हणाला….

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या दोन्ही चित्रपटांचा संदर्भ देणारे एक मजेशीर मीम शेअर केले आहे. या मीममधून त्यांनी अमली पदार्थांचा वापर, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे व अनोळखी व्यक्तींसोबत ओटीपी शेअर करणे या संदर्भात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बार्बीची सुरुवात ओपेनहायमरचा शेवट, नका होऊ देऊ तुमच्या आयुष्याचा असा चित्रपट’. मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत १८,००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक युजर्सनी भन्नाट भन्नाट कमेंट्स शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, मुंबई पोलिस रॉक.

वास्तविक या पोस्टमधून त्यांना सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही नियम तोडता तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ही बाब पटवून देण्यासाठी ‘बार्बी’ चित्रपटाचा संदर्भ देण्यात आला आहे. कारण- तिने तिच्या सोयीसाठी अनेक नियम तोडले आणि त्याचा शेवट वाईट झाला. शेवटच्या वाईट परिणामांसाठी ‘ओपेनहायमर’ चित्रपटाचा संदर्भ देण्यात आला आहे, असे एका युजरने लिहिले आहे.

दोन पूर्णपणे भिन्न शैलीच्या या चित्रपटांमधील चढाओढीत आता ‘बार्बीनहायमर’ हा नवा शब्द जन्माला आला आहे. नेटिझन्स हा शब्द दोन चित्रपटांचा एकत्रित संदर्भ देण्यासाठी वापरत आहेत. अशात आता मुंबई पोलिसांनाही या चित्रपटांनी भुरळ घातली आहे. मुंबई पोलिस सातत्याने आपल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून नागरिकांना गुन्हेगारांपासून सावध आणि सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. पण, त्यासाठी अनेकदा मजेशीर मीम्स आणि पोस्टचाही आधार घेतात.

Story img Loader