Viral Video : पोलीस हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पोलीस हे दिवसरात्र समाजासाठी काम करत असतात. सणवार सोडून फक्त फक्त समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा ते प्रयत्न करतात. अनेकदा ते स्वत:च्या आनंदाचा विचार करत नाही. अशा पोलिसांना एखाद्या वेळी आनंदी पाहून आपल्यालाही आनंद होतो. (Mumbai police perform moonwalk dance on railway station video goes viral on Instagram)

सध्या सोशल मीडियावर अनेक पोलीस सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आहे. या व्हिडीओमध्ये पोलीच चक्क मूनवॉक डान्स करत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही पोलीस मंडळी रेल्वेस्टेशनवर उभे आहेत. व्हिडीओत पुढे दिसते की त्यातील एक पोलीस पुढे येतो आणि चक्क मूनवॉक डान्स करतो. पोलीसाचा मूनवॉक डान्स पाहून कोणीही अवाक् होईल.

हेही वाचा : “याला म्हणतात खरा फिटनेस!” न थांबता फक्त ६० सेकंदात मारले २५ पुल-अप्स’, ५६ वर्षांच्या मेजर जनरल यांचा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

cop_a_clown या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अक्षय जाधव नावाच्या मुंबई पोलीसाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम बायकोमध्ये दिलेल्या माहितीनुसार अक्षय जाधव हा उत्तम डान्सर आणि रॅपर आहे. त्याचे वडिलसुद्धा पोलीस आहे. आणि तो सध्या पोलीस आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप वर्षा नंतर खाकी घालून मून वॉक”

हेही वाचा : मंदिराची तोडफोड करण्याचा मुस्लिम व्यक्तीवर आरोप; पण दर्ग्यात दडलं होतं सत्य, समोर आली Video मागची खरी गोष्ट

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सण नाही, उत्सव नाही. नाही घरच्यांसाठी वेळ, पोलीसांची नोकरी म्हणजे नुसता जीवावरचा खेळ” तर एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राचा मायकल जॅक्सन” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रभूदेवा २.०” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी पोलीसाचे मायकल जॅक्सन म्हणत कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वीही पोलिसांचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेकदा पोलीस डान्स करताना दिसून येतात तर कधी गाणी म्हणताना दिसतात. युजर्सना पोलिसांचे व्हिडीओ पाहायला आवडतात.