मुंबई पोलीस सोशल मीडियाचा वापर करून प्रत्येकासाठी वेळोवेळी अनोख्या अंदाजात वाहतुकीचे नियम आणि त्यांच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी पोस्ट मधून सांगत असतात. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी सुद्धा ते नेहमीच धावून येतात. तर याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुंबई पोलिसांनी एका जखमी गिर्यारोहक महिलेला सुखरूप दवाखान्यत नेण्यासाठी कशाप्रकारे जुगाड केला हे पोस्टमध्ये सांगितले आहे.
मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका जखमी गिर्यारोहक महिलेच्या मदतीसाठी धावून गेली . क्यूआरटी टीमला कर्नाळा किल्ल्यावरील प्रशिक्षण सराव संपवून खाली उतरत असताना त्यांना एक दृश्य दिसलं. तिथे त्यांना एक महिला फ्रॅक्चर अवस्थेत दिसली आणि तिला मदतीची गरज होती.
हेही वाचा…कार्डबोर्डपासून बनवला ‘असा’ कॉम्प्युटर गेम! चिमुकल्याचे टॅलेंट पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच उपस्थित ठिकाणी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी महिलेलवर उपचार करण्यासाठी खास उपाय केला आणि आपत्कालीन परिस्थिती अनोख्या पद्धतीत हाताळण्याची तयारी दाखवली. महिलेला घेऊन जाण्यासाठी क्यूआरटी (जवान) टीमच्या ट्रॅकसूटचा एक तात्पुरता स्ट्रेचर बनवला आणि जखमी महिलेला काळजीपूर्वक बेस कॅम्पपर्यंत नेले.
जखमी महिलेला सुखरूप बेस कॅम्पपर्यंत नेण्यासाठी त्यांना सुमारे दोन तास लागले. त्यानंतर महिलेला योग्यरित्या वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मुंबई पोलीस यांच्या @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि घडलेला सर्व प्रकार त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांचे विविध शब्दात कौतुक करताना दिसले आहेत.