सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे दरम्यान मुंबई पोलिसांनी अफावांचे खंडन केले. अधिकृत एक्सवर खात्यावर पोस्ट करून मुंबई पोलिसांनी या व्हिडिओमधील दावा चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केली.

मुंबई पोलिसांनी केले अफवांचे खंडन

त्याचे झाले असे की, मंगळवारी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीने कोयत्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी “अफवांचे” खंडन केले आणि लोकांना व्हिडिओ शेअर करू नये असे आवाहन केले.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही

व्हिडीओ शेअर करू नका : मुंबई पोलिस

X वरील एका पोस्टमध्ये, मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलने लिहिले की, “विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल व्हिडिओ प्रसारित केला जात आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की मुंबईच्या रस्त्यांवर एका व्यक्तीची विळ्याने हत्या करण्यात आली आहे. वरील घटना मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात घडलेली नाही. नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि व्हिडिओ शेअर करून नये.”

येथे पाहा ट्विट

https://twitter.com/MumbaiPolice/status/1818327640820048023

मुंबई पोलिसांचे ट्विट
मुंबई पोलिसांचे ट्विट

वृत्तानुसार, पीडित २२ वर्षीय बांधकाम कामगारावर ५२ वर्षीय गवंडीने पाण्याची मागणी केल्यामुळे तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. गवंडीने त्या माणसाच्या पोटावर आणि डोक्यावर विळा वार केला. जखमींचा मृत्यू झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक घटनाही चर्चेत

दुसऱ्या एका घटनेत, महाराष्ट्र पोलिसांना मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका ५० वर्षीय अमेरिकन महिलेला झाडाला बेड्या ठोकलेल्या अवस्थेत सापडले. महिलेच्या बॅगेत सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे “हत्येचा प्रयत्न” गुन्हा दाखल करण्यात आला. ललिता काय ही महिला २७ जुलै रोजी मुंबईपासून ४५० किमी अंतरावर असलेल्या सावंतवाडीतील सोनुर्ली गावात आढळून आली, जेव्हा मदतीसाठी तिचा आरडाओरडा करत असताना एका मेंढपाळाने आले तेव्हा ही घडना समजली. ही महिला स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असल्याचे दिसून येत असून तिला सध्या गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.