Mumbai Police Shares Beautiful Message On Friendship Day : फ्रेंडशिप डे २०२३ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मैत्रीचे धागेदोरे घट्ट बांधण्यासाठी आपल्या जीवलग मित्र-मैत्रिणीला भेटण्याची अननेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संकटात सापडल्यावर जो खरा मित्र असतो तो दुसऱ्या मित्रासाठी धावून येतो. पण प्रत्येक क्षणाला ज्यांना आपली काळजी असते, ती म्हणजे पोलीस यंत्रणाच. कोरोना काळात जीवाची बाजी लावून पोलिसांनी नागरिकांचा रक्षण केलं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. कर्त्यव्याचं पालन करून लोकांच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण नेहमीच अभिवादन करतो. आताही मुंबई पोलिसांनी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर असलेला मेसेज ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने शेअर केला आहे.
मुंबई पोलिसांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तुमच्यावर अत्याचार झालाय? काही चुकीचं घडत आहे? फेरीवाल्याची तक्रार करायची आहे का? तुम्ही असुरक्षित आहात का? असे प्रश्न विचारत पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘डायल १००’ असा मेसेज केला आहे. कोणत्याही व्यक्तीला असुरक्षित वाटल्यात १०० नंबरवर कॉल केला की थेट संपर्क पोलिसांना होतो. आता पुन्हा एकदा पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी अखंड तत्पर असल्याचा मेसेज केला आहे. लोकांना काहीही समस्या असल्यास फक्त १०० नंबर डायल करा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
इथे पाहा मुंबई पोलिसांनी शेअर केलेली पोस्ट
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे असतो, असं अनेकांना वाटतं. तर इंग्लंडमध्ये ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिपडे म्हणून साजरा केला जातो. इतर देशांच्या तुलनेत भारतातील नागरिक फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. शाळा, कॉलेज, कार्यालयात काम करणारे कर्मचारी, तसंच कुटुंबातील मित्र मंडळी असो, सर्वच मैत्रीचे धागेदोरे बांधण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच मुंबई पोलिसांनीही लोकांना आम्ही तुमचे खास मित्र असून तुमच्या सेवेसाठी कायम हजर आहोत, असा मेसेज करून नागरिकांना दिलासा दिला आहे.