Mumbai Police shares Monsoon Driving Tips: आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचलंय, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे, तर मुंबई लोकलसुद्धा उशिराने सुरू आहेत. पण, नोकरीसाठी नोकरदार वर्गाला घराबाहेर पडावंच लागतं. त्यामुळे बस, ट्रेनने जाणारा जसा नागरिकांचा गट आहे, तसाच वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडणारेही अनेक जण आहेत. तर आता हे पाहता मुंबई पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ११ ड्रायव्हिंग टिप्स शेअर केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा…
अनेकदा वाहनचालकांच्या एखाद्या चुकीमुळे रस्त्यावर अपघात होतात, त्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. मुसळधार पावसात भीतीने नाही तर आनंदाने वाहन चालवण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि काही टिप्स शेअर केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी शहरातील रहिवाशांसाठी शेअर केलेल्या ११ टिप्स पुढीलप्रमाणे…
१. हॉर्न व्यवस्थित चालतो आहे ना याची खात्री करा.
२. कारची वेंटिलेशन सिस्टम तपासा आणि वेळीच स्वच्छ करून घ्या.
३. वाहनांवर फांद्या पडू नयेत म्हणून झाडांपासून गाडी दूर पार्क करा.
४. आवश्यकतेनुसार कारचे एअर फिल्टर तपासा आणि बदलून घ्या.
५. विंडशील्ड वायपर ब्लेड्सची नियमित तपासणी करा आणि रिन्यूव्ह करून घ्या.
६. कारच्या एक्झॉस्ट सिस्टमचे निरीक्षण करा आणि देखभाल करा.
७. टायर प्रेशरचे नियमितपणे निरीक्षण करा.
८. मुसळधार पावसात हेडलाइट्स वापरा.
९. इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
१०. अचानक ब्रेक मारणं टाळा.
११. कारची देखभाल करा. कारण पावसामुळे भिजल्याने गाडीला गंज लागण्याची दाट शक्यता असते आदी टिप्स मुंबई पोलिसांनी शेअर केल्या आहेत.मुंबई पोलिसांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…मुस्लिम तरुणाला हिंदूं तरुणांनी केली जबर मारहाण? मात्र घटनेची खरी बाजू काय? Fact Check Video पाहा
पोस्ट नक्की बघा…
पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, मुंबई पोलिसांनी रहिवाशांना पावसात अपघात कसा टाळावा यासाठी या ११ टिप्स सुचवल्या आहेत; ज्या प्रत्येक वाहनचालकांसाठी उपयोगी आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट मुंबई पोलिसांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. “भीतीने नव्हे तर आनंदाने वाहन चालवा”, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी मुंबई पोलिसांचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.