आंदोलन, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक ठिकाणी शहरात कायदा आणि सुवव्यस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात. नागरिकांना त्याच्या जवाबदारीची जाणीव तर वाहन चालकांना वाहतुकीचे नियम वेळोवेळी अनोख्या पद्धतीत सांगताना दिसतात. अशातच आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची पोस्ट व्हायरल होत आहे. पण, मुंबई पोलिसांनी आज चक्क प्रसिद्ध ब्रँडच्या नावाचा आधार घेत वाहतुकीचे नियम सांगितले आहेत.
मुंबई पोलिसांनी चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी प्रसिद्ध ब्रँडच्या नावांचा उपयोग करून वाहतुकीचे नियम सांगण्यात आले आहेत.
पहिल्या फोटोत हिताची (HITACHI), दुसऱ्या फोटोत नॉइज (Noise), तिसऱ्या फोटोत ॲपल (Apple) , तर चौथ्या फोटोत शार्प (Sharp) या ब्रँडचा उल्लेख करून वाहतुकीचे नियम अनोख्या पद्धतीत सांगितले आहेत. एकदा पाहाच ही पोस्ट…
हेही वाचा…हे कसलं सरकारी काम? टोईंग कर्मचाऱ्यांनी वृद्ध जोडप्यासह कार नेली ओढत अन्… संतापजनक VIDEO व्हायरल
पोस्ट नक्की बघा…
तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध ब्रँडच्या नावाचा उल्लेख करत लिहिले की, वाहतुकीचे नियम पाळणं ‘हिताची’ (HITACHI) गोष्ट आहे. तर विनाकारण हॉर्न वाजवून नॉइज (Noise) प्रदूषण वाढवू नका. दुचाकी चालवताना आपले (Apple) हेल्मेट घालायला विसरू नका. तर हायवेवर गाडी चालवताना नजर शार्प (Sharp) असायला हवी ; असे वाहतुकीचे नियम सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट मुंबई पोलीस यांच्या @mumbaipolice या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ‘वाहतूकीचे नियम न पाळण्याच्या वृत्तीला टाटा (TATA) म्हणा’ #नियम पाळून स्मार्ट व्हा ; अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या अनोख्या स्टाईलने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.