Salute the Mumbai Police: मुंबई पोलीस रात्री अपरात्री आपले कर्तव्य बजावत असतात. कोणावर कोणतीही वेळ येऊदेत ते नेहमी आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. अशीच एका महिला शिपाई निकिता म्हात्रे यांनी एका वृद्धेला केलेल्या मदतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मुबंई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. कौटुंबिक वादातून ७२ वर्षीय सासूला सुनेने बेदम मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खार परिसरात घडली होती. त्यांना हालचालही करता येत नव्हती. त्यावेळी खार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल निकिता म्हात्रे यांनी वृद्धेला हाताने उचलून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली आणले होते. निकिता म्हात्रे यांच्या कामगिरीचे पोलीस दलात सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं ? –

वेणूबाई वाते ही ७२ वर्षांची वयोवृद्ध महिला खार येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहते. दरम्यान कौटुंबिक वादातून वेणूबाई यांना त्यांच्याच सुनेनं मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई निकिता म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिलेला वैद्यकीय उपचाराची तातडीने गरज होती. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता शिपाई निकीता म्हात्रे यांनी वेणूबाई यांनी कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले. आणि शंभर मीटर पायी चालत पोलिासांच्या व्हॅनमधून भाभा रुग्णालयात दाखल केले. त्यांचा हाच फोटो आता व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Mumbai police tweet मुंबई पोलिसांकडून कौतुक –

हेही वाचा – आनंद महिंद्रांना ‘या’ गाण्याची भुरळ, एकच गाणं वेगवेगळ्या भाषेत असलेला video ट्विट करत म्हणाले…

या कतृत्वामुळे पोलीस दलाकडून निकिता म्हात्रेंच्या कामगिरीचं कौतूक करण्यात आलं. तसेच पोलीस सहाय्यक आयुक्तांनी प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन त्यांचा सत्कारही केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police tweet mother in law brutally beaten by daughter in law woman constable nikita mhatre is being appreciated in the police force for helping an elderly woman srk