महाराष्ट्रात दरवर्षी गणेशोत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जातो. वाजत गाजत भाविक बाप्पाला घरी आणतात. चौका चौकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडळाचे मंडपामध्ये बाप्पाची स्थापना करतात. सुंदर फुलांची आरास करतात, विद्यूत रोषणाई करतात. कोणी हलता देखावा सादर करतात तर कोणी जिंवत देखावा सादर के यंदा अनेक मंडळानी विविध मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. लाखो भाविक बाप्पााच्या दर्शनासाठी आणि मंडळाची सजावट आणि सुंदर देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्यने येतात.

भक्तांच्या स्वागतासाठी प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने काम करताना दिसतात. पण दिवस-रात्र काम करून महाराष्ट्र पोलिस सर्व बंदोबस्त चोख पार पाडतात. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस महाराष्ट्रातील पोलिस १२ तास ड्युटीवर असतात. बापाच्या आगमनाच्या मिरवणूकीपासून विसर्जन मिरवणूकीपर्यंत महाराष्ट्र पोलिस चोकाचौकात उभे राहून वाहतूकीचे नियमन करतात, गर्दीचे नियोजन करतात आणि कडक सुरक्षा व्यवस्था करतात. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. सण उत्सवादरम्यान आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्याऐवजी हे जनतेची सेवा करताना दिसतात. पण त्यांच्या या कार्याची दखल घेतली जात नाही. सध्या गणेशोत्सवादरम्यान कार्यरत मुंबई पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा – Video : पुणेकरांनो, आता घरबसल्या मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन! एका क्लिकवर पाहा प्रसिद्ध गणपती मंडळाचे देखावे

व्हायरल व्हिडीओमध्ये चौकाचौकात तैनात केले पालिस कर्मचारी दिसत आहे. कोणी वाहतूकीचे नियमन करत आहे तर कोणी गर्दीचे नियोजन करत आहे. कोणी बाप्पाच्या मुर्तीच्या मिरवणुकीदरम्यान रुग्णवाहिकेला वाट करून दिली जाते. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – बाईsss .. हा काय प्रकार! पुराच्या पाण्यात अडकलेलं जोडपं कारच्या छतावर बसलं होतं गप्पा मारत; काका काकूंचा Video Viral

इंस्टाग्रामवर khadadpravasi हा व्हिडिओ शेअर केला जातो. व्हायरल व्हिडिओ शेअर करतान कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ना कुठलं मंडळ, ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, जिथे बंदोबस्त तिथेच सुखकर्ता दुःखहर्ता! ते फक्त तिथे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत आणि आपल्या राष्ट्रासाठी, आपला आनंद, आपले सण, आपली सुरक्षा इत्यादींसाठी काम करत आहेत. @mumbaipolice ते आमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे आहेत कारण त्यांच्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो. सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सुरक्षा कर्मचारी इत्यादींना विनम्र अभिवादन. तुमच्या मेहनतीला सलाम.
मुंबई गणेश चतुर्थी २०२४”

महाराष्ट्र पोलिसांच्या या कार्यासाठी प्रत्येक नागरिकांना आभार व्यक्त केले पाहिजे. पोलिस त्यांचे कार्य चोखपणे पार पाडत आहे त्यामुळे आपण आपले सण आणि उत्सव शांतपणे करू शकतो.

Story img Loader