Shocking Video: उज्जैन मधील एका कुटुंबाने अलीकडेच मुंबईतील महिलेच्या छळाला कंटाळून चक्क आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कुटुंबातील एका सदस्याने आत्महत्या करताना एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता ज्यात त्याची आई व पत्नी विष घेताना दिसत आहेत. रिमझिम दास नावाच्या एका महिलेकडून या कुटुंबाला ब्लॅकमेल केलं जात होतं व त्यामुळेच या कुटुंबाने विष पिऊन स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे समजतेय.

रिमझिमने यापूर्वी मुंबईत आशी खान नावाच्या व्यक्तीविरुद्ध कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत खटले दाखल केले होते. काही दिवसांनी हा इसम जामिनावर सुटल्यानंतर रिमझिमने यावेळी उज्जैनमध्ये पुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ज्जैनमधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि विष प्राशन करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

प्राप्त माहितीनुसार, आशी खान याचे सासरे नजीर अली यांनी सांगितले की, “माझ्या मुलीच्या लग्नाला आठ महिने झाले आहेत. मुंबईतील रिमझिम ही महिला पैशाची मागणी करत असून बलात्काराचा आरोप करून कुटुंबाला धमकी देत ​​आहे. आम्ही तिला दोनदा दीड लाख रुपये दिले पण ती अजून ५ लाख रुपये मागत आहे.”

नजीर अली यांच्या माहितीनुसार रिमझिम ही मुंबईत पॉर्न फिल्म मध्ये काम करते. आशी व नजीर यांच्या लेकीच्या लग्नानंतर तीन दिवसांनी तिने नजीर यांना धमक्या देण्यास सुरुवात केली होती. तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करेन, जावयाला मारून टाकेन अशी धमकी देत रिमझिमने आशीचे सासरे नजीर यांच्याकडूनही पैसे उकळण्याचे प्रयत्न केले. जेव्हा नजीर यांनी काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा तिने बलात्काराची खोटी तक्रार करून आशीची अटक घडवून आणली.

अटकेनंतर आशीने स्वतःची सुटका करण्यासाठी सासरे नजीर यांना दीड लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. पैसे दिल्यावर आशीची मुंबईतून सुटका झाली त्यानंतर तो उज्जैनला आला आणि रिमझिमने पुन्हा दोन लाख रुपये मागितले आणि त्याला पुन्हा अटक केली. आता परत ती ५ लाख रुपये मागत आहे. या सगळ्या प्रकाराला कंटाळून आम्ही आत्महत्या करत आहोत असे स्वतः नजीर यांच्या लेकीने कॉल करून सांगितल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Video करत सांगितलं, “ती’ पॉर्नस्टार..”

दरम्यान, रिमझिमने ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा करत तिला आशीबरोबर राहायचे असल्याचे सांगितले. दुसरीकडे इंडिया टुडेशी बोलताना मुख्य पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी सांगितले की, आशीच्या पत्नीची प्रकृती सध्या गंभीर आहे. या प्रकरणार सध्या तपास सुरु आहे.

Story img Loader