Viral video: मुंबई शहरातील सर्वच रेल्वेस्थानकं गर्दीनं गजबजलेली असतात. कोणत्याही वेळेला रेल्वेस्थानकावर गर्दी पाहायला मिळते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे २४ तास पोलिस तैनात असतात. मात्र, या गर्दीवर कायस्वरुपी तोडगा निघत नाही. याच गर्दीचा फायदा घेत चोर हातसफाई करतात; याचाच फटका रोज हजारो पर्यटकांना बसतो. सार्वजनिक ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळते. अशाच गर्दीचा फायदा घेऊन चोर चोरी करतात. दिवसभरातून अनेक प्रवाशांच्या वस्तू चोरी होत असतात. दिवसेंदिवस या चोरीच्या घटना वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ मुंबईतील रेल्वेस्थानकावरचा समोर आलाय, ज्यामध्ये एका चोराला चोरी करताना रंगेहात पकडलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल चोर कशाप्रकारे चोरी करतात.

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असू देत, पोलिस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. त्यात रेल्वेस्थानकावर अनेक चोऱ्या होतात. असाच एका रेल्वेस्थानकावरील चोरीचा व्हिडीओ समोर आला आहे. चोराची चोरीची शैली पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर रेल्वेस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चक्क एक लहान मुलगा चोरी करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याचा हा प्रयत्न प्रवाशांनी हाणून पाडलाय. हे चोर रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या मागे उभे राहतात आणि अलगत हात साफ करतात.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Theft , Achole police, Vasai , Vasai strange case,
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका प्रवाशानं त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. या चोरानं प्रवाशाची बॅग संपूर्णपणे उघडली आहे आणि तो चोरी करण्याच्या तयारीत असताना या प्रवाशानं त्याला पकडलं. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्हीही सावध राहा, कारण आता हे चोर मागच्या मागे बॅगमधून चोरी करण्याची नवी शक्कल लढवत आहेत. आता पकडल्यानंतर तो मान्य करायलाही तयार नाहीये. यावेळी प्रवाशांनी त्याला मारहाणही केली, तरीही तो मान्य करायला तयार नाही. मी चोरी केलीच नाही, मी काहीच केलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. मात्र, आता हे प्रवासी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचं म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत.

Story img Loader