Mumbai Railway Station Video : एक काळ असा होता की, लोक स्वत:च्या प्रसिद्धीसाठी खूप कष्ट घ्यायचे. पण बदलत्या काळानुसार परिस्थिती बदलली, हल्ली लोक एका व्हिडीओमुळेही लोकप्रिय होतात. भले तो व्हिडीओ नाचण्याचा असो वा गाण्याचा… लोक एखादं गाणं किंवा डायलॉग इतका व्हायरल करतात की, ते गाणं क्षणार्धात जगभरात ट्रेंड होऊ लागतं. काही वेळा तर लोक इतक्या रील्समध्ये इतक्या काही विचित्र गोष्टी करतात की, पाहताना आपल्याला चीड येते. पण तरीही असे विचित्रपणा करणारे लोक फेमस होतात. अलीकडेच एका तरुणीचे अशाच प्रकारचे विचित्र व्हिडीओ चर्चेत आले आहेत; जे पाहताना कोणालाही राग अनावर होईल.
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, लोक प्रसिद्धीसाठी रेल्वे स्टेशन आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणांचा वापर करतात. कारण- अशा ठिकाणच्या व्हिडींओंना अधिक पसंती दिली जाते. अशाच प्रकारे ही तरुणी रेल्वे स्टेशनवर व्हिडीओ बनवत असते.
भररेल्वे स्टेशनवर तरुणीचा विचित्र डान्स (Woman Dances At Railway Station)
तरुणीचा रेल्वे स्टेशनवरील विचित्र डान्स पाहून युजर्सचा संताप
यात आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका रेल्वे स्टेशनवरील बेंचवर एक महिला बसली आहे, आता ती उठून निघणार तितक्यात एक तरुणी डान्सच्या नावाखाली एक तिची मस्करी करू लागते. ती एका महिलेला जोरात धक्का देते; ज्यावर ती महिला चिडते आणि पकडून तिला मारण्याचा प्रयत्न करते. पण, ती तरुणी केस उडवत, हसत विचित्र प्रकारे नाचत तिची पुन्हा खोड काढते. त्यानंतर पुन्हा त्या महिलेला धक्का देते आणि मागून मान पकडत हसू लागते. या दोघी एकमेकींच्या ओळखीच्या होत्या; पण रीलसाठी त्या अनोळखी असल्याचे भासवत होत्या.
Read More Trending News : ११.६६ ग्रॅम सोने फक्त ११३ रुपये; सोशल मीडियावर व्हायरल होतोय बिलाचा PHOTO, युजर्स म्हणाले, “वेळ…”
व्हिडीओमला अनेकजण लाइक करत आहे आणि त्यावर विविध प्रकारच्या कमेंट करत आहे. एका युजरने लिहिले की, ही मुलगी तुरुंगवासाला पात्र आहे. तर दुसऱ्याने लिहिले, आता लोकांमध्ये हा ट्रेंड झाला आहे. त्याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट्स करून तिच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. (Mumbai Railway Station)
विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांनी या तरुणीला रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचे विचित्र व्हिडीओ न बनवण्याची सूचना यापूर्वी केली आहे. मात्र तरीही ही तरुणी कायद्याला न जुमानता प्रवाशांना त्रास होईल अशा प्रकारे स्टेशनवर वागत रील शूट करताना दिसते. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.