Mumbai Rain Viral Video : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस दिसून आला. शहरात अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं दिसून आले आहे. पावसाचा फटका रेल्वे सेवा आणि मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलवर पडलेला आहे. नागरीकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. (Mumbai rain heavy rain lash city suburbs train flight services hit video goes viral)
सध्या सोशल मीडियावर मुंबईतील पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. अनेक लोक पावसात अडकली आहे तर ऑफीस, कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली लोक माघारी जात आहे.
पाहा खालील काही व्हायरल व्हिडीओ –
परळ, दादर, सेवरी, कॉटन ग्रीन, एमटीएचएलच्या परिसरात सकाळी असे ढगाळ वातावरण दिसून आले.
एएनआयनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातील रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले दिसून आले.
हेही वाचा : चिपळूणमधील थरारक अपघाताचा VIDEO; उड्डाणपुलाचा खांब तोडताना रोप तुटला अन् तीन कामगार थेट…; भीतीदायक दृश्य
एका युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आर्थिक राजधानी मुंबईमधील पाण्याचे दृश्य दाखवले आहेत. या व्हिडीओत दुचाकी रस्त्यावर पडलेल्या पाण्यामध्ये वाहून जाताना दिसत आहे.
भांडूप रेल्वेस्टेशनजवळील व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
साकीनाका आणि कुर्ला परिसरात राहणाऱ्या लोकांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मुंबईतील यंदाचा पहिला पूर
मुंबईत जिकडे तिकडे पाऊस सुरू आहे. रस्ते, नाले, रेल्वे स्टेशन , बसस्थानक आणि अनेक परिसरात पाणी साचले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही लोक भर रस्त्यात अडकली आहे तर कुणी पावसाच्या भीतीने घराबाहेर पडत नाही. सध्या हे सर्व व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे.
किल्ले रायगडावर सुद्धा रविवारी ढग फुटी प्रमाणे पाऊस पडला. रायगडाच्या पायऱ्यांवर ओसंडून पाणी वाहत होते. पायऱ्यांवरचे पाणी पाहून तुम्हाला एखाद्या ओढ्याचे पाणी वाहून जात आहे, असे वाटेल. किल्ले रायगडाच्या महादरवाज्यातून सुद्धा पाणी वाहत होत. रायगडावरील या भयानक परिस्थितीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.