अंकिता देशकर
Mumbai Rain Video: उत्तरेकडील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातील काही भागात सुद्धा अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान मुंबईतूनही अनेक पूर आणि पाणी तुंबण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. लाईटहाऊस जर्नालिज्मला नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील एक असाच व्हिडीओ दिसून आला आहे. ट्रेन धावत येताच उद्भवलेली परिस्थिती पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं हा प्रकार कधी व कसा घडला हे जाणून घेऊया…
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Shubh ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ या वर्षीचा असल्याचा दावा करत शेअर करत आहेत.
तपास:
आमचा तपास आम्ही, ‘Nalasopara train station’ असे ट्विटर वर शोधण्यापासून सुरु केला. आम्हाला हा व्हिडिओ India Today च्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केलेला असल्याचे आढळले.
हा व्हिडीओ २० सप्टेंबर, २०१७ रोजी शेअर करण्यात आला होता. त्याच दिवशी Outlook India च्या ट्विटर प्रोफाइल वर देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आढळला.
आम्हाला २१ सप्टेंबर २०१७ रोजी NDTV India च्या YouTube चॅनलवर शेअर केलेला व्हिडिओ देखील आढळला.
आम्हाला ViralHog च्या YouTube चॅनेलवर व्हिडिओच संपूर्ण फुटेज देखील आढळून आलं.
या व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहितीत म्हटले होते की,
२० सप्टेंबर २०१७, नालासोपारा, भारत.
“आम्ही मुंबईजवळील नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभे होतो, आणि एक ट्रेन जात होती. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला पाणी साचले होते. ट्रेनचा वेग कमी करण्याऐवजी किंवा थांबवण्याऐवजी, मोटरमनने वेगाने ट्रेन चालवली त्यामुळे प्लॅटफॉर्मवर उभी असलेली लोकं पाण्याने भिजून गेली.
हे ही वाचा<< कोविडच्या लसीचे पूर्ण डोस घेतलेल्या महिलांच्या बाळांना गंभीर हृदयविकार; WHO ने कबुली दिल्याची पोस्ट चर्चेत पण…
निष्कर्ष: नालासोपारा रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याचा व्हायरल व्हिडिओ २०१७ चा आहे. २०२३ च्या पावसातील नाही .