Mumbai Viral Video : काही दिवसांपूर्वी पुणे मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ठिकठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. अनेक लोक रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकले होते. काही लोकांना त्यांच्या घरी पोहचायला रात्रीचे १२-१ वाजले. अनेक लोक रस्त्यावरचे ट्रॅफिक दूर करण्यास, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून लोकांना बाहेर काढताना दिसले. सध्या मुंबईचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही नाक्यावरची तरुण मुले रस्त्यावर उतरून पावसात अडकलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. (Mumbai rain video Mumbaikar Young guys ran to help people stuck in the rain watch ghatkopar viral video)

पावसात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले तरुण

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईतील घाटकोपर येथील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रस्त्यावर खूप पाणी साचलेले दिसत आहे. रस्तांना नद्याचे स्वरुप आले आहेत. लोकांना पायी चालणे आणि रस्त्यावरून गाडी चालवण्यास अडचण येत आहे. अशा परिस्थितीत नाक्यावरची तरुण मुले समोर येतात आणि साखळी करून काही लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करतात. काही तरुण मुले रस्त्यावरून साचलेल्या पाण्यातून लोकांना दुचाकी, चारचाकी पुढे नेण्यास मदत करत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “नाक्यावरची मुले वाईट नसतात. वाईट वेळेत तीच मुले पुढे असतात.”

हेही वाचा : “पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं ते उगाच नाही!” जगात नाही अशी रिक्षा आपल्या पुण्यात; Video होतोय Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : ‘मुंबईकरांनो सावधान’ म्हणत शेअर होतोयं VIDEO ; नाशिक महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा; वाचा घटनेची खरी गोष्ट

kuldeep_tajane_kulya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमचा नाका, आमची जबाबदारी” तर एका युजरने लिहिलेय, “नेत्यांच्या नादी नका लागू, ही बघा ही खरी माणुसकी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलं स्वभावाने कशी ही असली तरी त्यातली ९९ टक्के मुलं मनाने खुप चांगली असतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “जिंदादिल आमची मुंबई” एक युजर लिहितो, “नाक्यावरची मुलं नेहमी मदत करायला तयार राहतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.